PAK vs NEP, Imam Ul Haq wicket: आशिया चषक स्पर्धेच्या १६व्या आवृत्तीला बुधवारी (३० ऑगस्ट) सुरुवात झाली. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात नेपाळसमोर यजमान पाकिस्तानचे आव्हान आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. नेपाळचा संघ प्रथमच पाकिस्तानशी कोणत्याही फॉरमॅटमध्ये खेळत आहे. दोन्ही संघांना आशिया चषक स्पर्धेत ‘अ’ गटात ठेवण्यात आले आहे. यामध्ये भारतीय संघाचाही समावेश आहे. दरम्यान पहिल्याच सामन्यात नेपाळने कमाल केली असून पहिल्या पॉवर प्ले मध्ये दोन विकेट्स घेतल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यातील आशिया चषकातील पहिल्या सामन्यात पाकिस्तानला फखर जमानच्या रूपाने पहिला धक्का बसला. फखर १४ धावा करून झेलबाद झाला. वास्तविक, फखरला वेगवान गोलंदाज करण केसी याने ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकून शॉट खेळण्यास भाग पाडले. हा असा चेंडू असा होता की खेळण्याच्या प्रक्रियेत पाकिस्तानी फलंदाजाच्या बॅटचा किनारा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात गेला आणि त्याने शानदार झेल घेत त्याला बाद केले.

पाकिस्तान त्यातून सावरतो न सावरतो तेवढ्यात इमाम उल हक ही फार काही करू शकला नाही आणि केवळ ५ धावा करून धावबाद झाला. इमाम उल हकला नेपाळचा कर्णधार रोहित पौडेलने रॉकेट थ्रो करत धावबाद केले. रोहित पौडेलच्या थ्रोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. त्याने केलेला हा रन आउटचा हा थ्रोचा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे.

खरं तर, ७व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर, फलंदाज इमामने ऑफ साइडमध्ये कव्हरच्या दिशेने शॉट खेळून सिंगल घेण्याचा प्रयत्न केला परंतु क्षेत्ररक्षक रोहित तिथे उपस्थित होता. रोहितने वेग दाखवत शानदार थ्रो नॉन स्ट्राईक एंडला केला आणि स्टंप उखडून टाकला. फलंदाज इमामने डायव्हिंग करून स्वत:ला धावबाद होण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला, पण हा थ्रो इतका अप्रतिम होता की फलंदाज त्याच्या क्रीजपासून दूरच राहिला.

हेही वाचा: Asia Cup 2023: “आशिया चषकाचे सर्व सामने पाकिस्तानात…” बाबर आझमने PAK vs NEP सामन्यापूर्वी व्यक्त केली खंत

पाकिस्तानची धावसंख्या १३ षटकात ६३/२

दोन विकेट्स पडल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी संघाची धुरा सांभाळली आहे. पाकिस्तानने १३ षटकात २ विकेट्स गमावत ६४ धावा केल्या आहेत. बाबर आणि रिझवान यांनी तिसऱ्या विकेटसाठी ३९ धावांची भागीदारी केली आहे. रिझवान २४ तर बाबर १५ धावांवर नाबाद आहे.

पाकिस्तान विरुद्ध नेपाळ यांच्यातील आशिया चषकातील पहिला सामना पाकिस्तानच्या मुलतान स्टेडियमवर खेळला जात आहे. जरी या सामन्यात प्रेक्षकांनी फारसा रस दाखवला नसला तरी १० टक्के चाहते स्टेडियममध्ये पोहोचले आहेत. मात्र, पूर्णपणे रिकामे स्टेडियम पाहिल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला आहे. पाकिस्तानातील रिकामे स्टेडियम पाहून चाहते सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

हेही वाचा: IND vs PAK: “भारत-पाकिस्तान सामना अ‍ॅशेसपेक्षा मोठा”, ऑस्ट्रेलियन दिग्गज टॉम मूडी असे का म्हणाले? जाणून घ्या

दोन्ही संघांचे प्लेइंग-११

पाकिस्तान: फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ.

नेपाळ: कुशल भुर्तेल, आसिफ शेख (विकेटकीपर), रोहित पौडेल (कर्णधार), आरिफ शेख, कुशल मल्ला, दीपेंद्र सिंग ऐरे, गुलशन झा, सोमपाल कामी, करण केसी, संदीप लामिछाने, ललित राजवंशी.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nepali players rocket throw created panic imam ul haq was run out you will get goosebumps video avw
Show comments