Nepal Eighth Team to Participate in Asia Cup: आशिया कप २०२३ चा पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात खेळला जात आहे. मुलतानच्या मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. त्याचबरोबर नेपाळच्या संघाने पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरताच इतिहास रचला आहे. वास्तविक, नेपाळचा संघ प्रथमच आशिया कपमध्ये खेळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा कारनामा करणारा ठरला आठवा देश –

तो आशिया कप स्पर्धेत सहभागी होणारा आठवा देश ठरला आहे.यापूर्वी भारताशिवाय पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, संयुक्त अरब अमिराती, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग हे संघ आशिया कपमध्ये खेळले आहेत. अशाप्रकारे नेपाळ हा आशिया कप खेळणारा आठवा संघ ठरला आहे.
आशिया चषक पहिल्यांदा १९८४ मध्ये खेळवण्यात आला होता.

आशिया चषक स्पर्धा पहिल्यांदा १९८४ मध्ये खेळली गेली. या स्पर्धेचे सामने शारजाह येथे झाले होते. त्याचबरोबर आशिया कप स्पर्धेची पहिला हंगाम भारतीय संघाने जिंकला होता. त्याचबरोबर आतापर्यंत सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकणाऱ्या संघात भारत अव्वल आहे. यानंतर श्रीलंकेचा दुसरा लागतो. तसेच पाकिस्तानचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. आशिया चषक २०२३ पाकिस्तान व्यतिरिक्त श्रीलंकेत खेळवला जात आहे.

हेही वाचा – Maharaja Trophy 2023: सीमारेषेवर मनीष पांडेने केले जबरदस्त क्षेत्ररक्षण; संघाला मिळवून दिले विजेतेपद, पाहा VIDEO

पाकिस्तान आणि नेपाळ सामन्याबद्दल बोलायचे तर, या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पाकिस्तानने १८ षटकांत २ गडी गमावून ८३ धावा केल्या आहेत. मोहम्मद रिझवान (२७) आणि बाबर आझम (३१) दोघे खेळपट्टीवर नाबाद आहेत. नेपाळ संघाकडून गोलंदाजी करताना करण केसीने एक विकेट घेतली.

पाकिस्तान: फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ.

हेही वाचा – World Cup 2023: बांगलादेशला मोठा धक्का! Asia Cup पाठोपाठ विश्वचषकातून ‘हा’ वेगवान गोलंदाज पडला बाहेर

नेपाळ : कुशल भुर्तेल, आसिफ शेख (विकेटकीपर), रोहित पौडेल (कर्णधार), आरिफ शेख, कुशल मल्ला, दीपेंद्र सिंग ऐरे, गुलशन झा, सोमपाल कामी, करण केसी, संदीप लामिछाने, ललित राजवंशी.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nepals team has become the eighth team to participate in the asia cup vbm
Show comments