कनिष्ठ महिला विश्वचषक हॉकी स्पर्धेतील भारताची विजयी घोडदौड गुरुवारी नेदरलँड्सने अखेर संपुष्टात आणली. उपांत्य फेरीच्या लढतीत गतविजेत्या नेदरलँड्सने भारताला ३-० असे पराभूत केले.
स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवणाऱ्या भारतीय संघाने बलाढय़ नेदरलँड्सला कडवी लढत दिली. पण अंतिम फेरीत मजल मारण्यात भारत अपयशी ठरला. लिएके व्हॅन विक (१७व्या मिनिटाला), लिसाने डे लांगे (५७व्या मिनिटाला) आणि लिसा श्चिरलिंक (६८व्या मिनिटाला) यांनी गोल करत नेदरलँड्सला अंतिम फेरीत पोहोचवले. अंतिम फेरीत नेदरलँड्सची गाठ अर्जेटिनाशी होईल. तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठीच्या सामन्यात भारताची गाठ इंग्लंडशी पडेल.

Story img Loader