वर्ल्डकप स्पर्धेत लिंबूटिंबू म्हणून गणना होणाऱ्या नेदरलँड्सने शनिवारी कोलकाता इथे झालेल्या लढतीत बांगलादेशला नमवलं. काही दिवसांपूर्वी नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला हरवण्याची किमया केली होती. कसोटी खेळणाऱ्या देशांना चीतपट करत नेदरलँड्सने लिंबूटिंबू नसल्याचं कृतीतून दाखवून दिलं आहे. या पराभवासह बांगलादेशसाठी बाद फेरीचा मार्ग जवळजवळ बंद झाला आहे. ६ सामन्यांपैकी केवळ एका सामन्यात त्यांना विजय मिळवता आला आहे. नेदरलँड्सने ६ पैकी २ सामन्यात विजय मिळवत संघर्ष सुरू ठेवला आहे.

२३० लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशच्या फलंदाजांनी आततायी फटके खेळत विकेट्स गमावल्या. सलामीवीर लिट्टन दास आणि तान्झिड हसन हे सहाव्या षटकापर्यंत माघारी परतले. तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्यात आलेल्या मेहदी हसन मिराझने ३५ धावांची संयमी खेळी केली. नझमुल होसेन शंटो ९ धावा करुन बाद झाला. अनुभवी शकीब उल हसनही मोठी खेळी करु शकला नाही. विकेटकीपर फलंदाज मुशफकीर रहीम व्हॅन मीकरनच्या गोलंजाजीवर त्रिफळाचीत झाला. मीकरनने या तिघांना बाद करत बांगलादेच्या डावाला खिंडारच पाडलं. तळाच्या फलंदाजांनी थोडा प्रतिकार केला पण तो अपुराच ठरला. महमदुल्लाने आणि मुस्ताफिझूर रहमान यांनी प्रत्येकी २० धावा केल्या. नेदरलँड्सतर्फे पॉल व्हॅन मीकरनने चार विकेट्स पटकावल्या. बॅस डी लीडने २ तर आर्यन दत्त, लोगन व्हॅन बीक, कॉलिन अॅकरमन यांनी एकेक विकेट घेत मीकरनला चांगली साथ दिली. बांगलादेशच्या एकाही फलंदाजाला अर्धशतकही झळकावता आलं नाही. मीकरनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

Mohammed Kaif Statement India Defeat Said You will beat Pakistan in Champions Trophy and will act like we are the best
“पाकिस्तानवर विजय मिळवाल अन्…”, भारताच्या कसोटी मालिका पराभवावर माजी क्रिकेटपटूने टीम इंडियाला सुनावलं
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Loksatta anvyarth Gautam Gambhir India lose in Test series
अन्वयार्थ: खरेच ‘गंभीर’ आहोत?
Border-Gavaskar Trophy Test series Team India defeat australia jasprit bumrah virat kohli rohit sharma
विश्लेषण : बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत टीम इंडियाच्या पराभवास कारणीभूत ठरले हे सहा घटक…
India Disqualified From WTC Final After Defeating in Border Gavaskar Trophy Australia vs South Africa
WTC Final: भारत WTC फायनलसाठी ‘नापास’; वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं काही; ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिकेत रंगणार अंतिम सामना
IND v AUS Australia wins BGT 2025 after 10 years against India
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाने १० वर्षांनी भारताला नमवत जिंकली बॉर्डर गावस्कर ट्रॉफी, WTC फायनलमध्ये मारली धडक
IND vs AUS 5th Test Australia need 162 runs win Sydney Test
IND vs AUS : बोलंडच्या दमदार गोलंदाजीसमोर पंतचे अर्धशतक पडले फिके, ऑस्ट्रेलियाला विजयासाठी मिळाले १६२ धावांचे लक्ष्य
IND vs AUS Sunil Gavaskar on Jassprit Bumrah injury
IND vs AUS : ‘जर बुमराह तंदुरुस्त नसेल तर २०० धावाही कमी…’, सुनील गावस्करांच्या वक्तव्याने भारतीय चाहत्यांची वाढली चिंता

आणखी वाचा: टोंगा ते नेदरलँड्स व्हाया ऑस्ट्रेलिया; नेदरलँड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सचं अनोखं स्थित्यंतर

कोलकाता इथे झालेल्या यंदाच्या वर्ल्डकपच्या पहिल्याच लढतीत नेदरलँड्सने संस्मरणीय विजय मिळवला. नाणेफेक जिंकून नेदरलँड्सने फलंदाजीचा निर्णय घेतला. पण बांगलादेशच्या गोलंदाजांनी त्यांची अवस्था २/४ अशी अवस्था केली. यानंतर वेस्ले बारेसी आणि कॉलिन अॅकरमन यांनी डाव सावरला. मात्र या दोघांना लागोपाठ बाद करत बांगलादेशने नेदरलँड्सवरचं दडपण वाढवलं.

नेदरलँड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने स्वत:ला फलंदाजीत बढती घेतली. त्याने ६८ धावांची संयमी खेळी करत डावाला आकार दिला. सायब्रँड एंजेलब्रेच्टने ३५ धावा करत त्याला चांगली साथ दिली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी ७८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. ही जोडी फुटल्यानंतर नेदरलँड्सची पुन्हा घसरगुंडी उडाली आणि त्यांचा डाव २२९ धावांतच आटोपला. बांगलादेशतर्फे शोरिफुल इस्लाम, तास्किन अहमद, मुस्ताफिझूर रहमान, मेहदी हसन यांनी प्रत्येक २ विकेट्स घेतल्या.

Story img Loader