बर्लिन : कोडी गाकपोची भन्नाट वेगवान आक्रमकता आणि त्याला रोखण्याच्या नादात मेर्ट मुलदूरकडून अनवधानाने झालेल्या स्वयंगोल, त्यापूर्वी स्टिफन डी व्रायने केलेला बरोबरीचा गोल यामुळे नेदरलँड्सने युरो अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत तुर्कीचा २-१ असा पराभव केला. त्यामुळे नेदरलँड्सला तब्बल २० वर्षांनी युरो स्पर्धेची उपांत्य फेरी गाठता आली.

सामन्याच्या ३५व्या मिनिटाला सामेत अकायदिनच्या अचूक हेडरमुळे तुर्कीने आघाडी घेतली. उत्तरार्धात सामन्याच्या ७०व्या मिनिटाला डी व्रायने नेदरलँड्सला बरोबरी साधून दिली. सहाच मिनिटांनी मेर्ट मुलदूरकडून स्वयंगोल झाल्याने नेदरलँड्सला २-१ अशी आघाडी मिळाली आणि याच आघाडीवर त्यांचा विजय साकार झाला. नेदरलँड्सला २००४ नंतर प्रथमच युरो स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवता आले. त्या वेळी पोर्तुगाल येथे झालेल्या स्पर्धेत नेदरलँड्सने स्वीडनचा शूटआऊटमध्ये ५-४ असा पराभव केला होता.

ENG vs AUS Liam Livingstone smashed 28 runs in a over of Mitchell Starc video viral
IPL मध्ये एका हंगामात २४ कोटी कमावणाऱ्या मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीच्या ठिकऱ्या; लिव्हिंगस्टोनने ६ चेंडूत चोपल्या २८ धावा
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
India grandmaster chess player D Gukesh expressed that he did not even think about it during the chess Olympiad sport news
ऑलिम्पियाड स्पर्धेदरम्यान जगज्जेतेपदाच्या लढतीचा विचारही नाही -गुकेश
Chess Olympiad Nona Gaprindashvili Cup given to India at Chennai 2022 goes missing by Indian Chess Federation
Chess Olympiad: ऑलिम्पियाड करंडक भारताकडून गहाळ, बुद्धिबळ महासंघाची बेफिकिरी, पर्यायी बक्षिस वितरीत होण्याची शक्यता
Mitchell Starc on Virat Kohli about IND vs AUS Test Series
‘मला त्याच्याविरुद्ध खेळताना…’, मिचेल स्टार्कचे विराटबरोबरच्या स्पर्धेबाबत मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘आमच्या दोघात…’
AUS vs SCO Australia Team video viral with interesting Trophy
२६००० किमीचा प्रवास करुन ऑस्ट्रेलियाला मिळालं वाडगं; चाहत्यांच्या मजेशीर प्रतिक्रियेने वेधलं लक्ष
Ajit Agarkar to Sent Musheer Khan on Australia Tour with India A Squad Just After 7 Matches Impressed by His Innings
Musheer Khan: मुशीर खानच्या खेळीवर अजित आगरकर फिदा; फक्त ७ सामने खेळूनही जाणार ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर
American Jessica Pegula advances to US Open women singles final sport news
पेगुलाची अंतिम फेरीत धडक, मुचोव्हावर मात; आता अरिना सबालेन्काचे आव्हान

हेही वाचा >>>IND vs ZIM 2nd T20I : अभिषेक शर्माच्या शतकाच्या जोरावर भारताचा झिम्बाब्वेवर दणदणीत विजय, १०० धावांनी उडवला धुव्वा

यंदाच्या स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेल्या गाकपोला तुर्कीने रोखण्याचा प्रयत्न केला. विश्रांतीला एका गोलने पिछाडीवर राहावे लागल्यानंतर उत्तरार्धात गाकपोला उंचपुरा आघाडीपटू व्हेघॉस्र्टची साथ मिळाली. ७०व्या मिनिटाला डिपाय आणि शौटन यांच्या एकत्रित प्रयत्नाला डी व्रायने पूर्ण स्वरूप दिले. त्याने हेडरच्या मार्फत मारलेला वेगवान फटका अडवण्याची तुर्कीचा गोलरक्षक गुनॉकला संधीच मिळाली नाही. त्यानंतर सहाच मिनिटांनी मैदानाच्या मध्यातून चेंडूचा ताबा घेऊन गाकपोने वेगाने मुसंडी मारली होती. त्याला रोखण्यासाठी तुर्कीचा मेर्ट मुलदूर कमालीच्या वेगाने धावत आला. मात्र, गाकपोचा क्रॉस झेपावून परतवून लावण्याच्या नादात त्याने चेंडू आपल्याच जाळीत मारला.

तुर्कीने अखेपर्यंत झुंज दिली. एका गोलच्या आघाडीनंतर उत्तरार्धात ५६व्या मिनिटाला मिळालेल्या फ्री-किकवर आर्दा गुलेर दुर्दैवी ठरला. जमिनीपासून थोडय़ाच उंचीवरून गुलेरची किक स्विंग होऊन अगदी अखेरच्या क्षणी गोलपोस्टला स्पर्श करून बाहेर गेली. त्यानंतर नेदरलँड्सचा गोलरक्षक बार्ट व्हरब्रुगेनला कमालीचे सतर्क राहावे लागले. प्रथम बारिस यिल्माजचा प्रयत्न त्याने हाणून पाडला. भरपाई वेळेत किलिक्सोयने मारलेला हेडरचा फटका व्हरब्रुगेनने अप्रतिमरीत्या अडवला.