नेदरलँड्सचा संघ प्रदीर्घ कालावधीनंतर वर्ल्डकपमध्ये सहभागी होतो आहे. ऑरेंज आर्मी अशी बिरुदावली मिरवणाऱ्या या संघात तीन भारतीय वंशाचे खेळाडू खेळत आहेत. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल.

पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत नेदरलँड्सचा सलामीवीर विक्रमजीत सिंगने आपल्या दमदार खेळाने चाहत्यांना प्रभावित केलं. डावखुऱ्या पंजाब दा पुत्तरने आपल्या खेळाच्या बळावर वाहवा मिळवली. दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर फलंदाज आणि विकेटकीपर क्विंटन डी कॉक हा विक्रमजीतसाठी आदर्श आहे. वर्ल्डकपच्या निमित्ताने विक्रमजीतला क्विंटनला भेटला आलं आहे, त्याच्याकडून फलंदाजीसंदर्भात बारकावे शिकून घेता आले आहेत.

zakir naik in pakistan
भारतात वॉन्टेड झाकीर नाईक पाकिस्तानात; मुस्लीम धर्मोपदेशकाचा पाकिस्तानला जाण्यामागे हेतू काय?
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Australian captain Pat Cummins statement regarding Rishabh Pant
पंतला रोखणे आवश्यक -कमिन्स
Pat Cummins on Rishabh Pant ahead of Border Gavaskar Trophy 2024
विराट-रोहित नव्हे तर ‘या’ भारतीय खेळाडूची ऑस्ट्रेलियाला धास्ती; पॅट कमिन्स म्हणाला, “त्याला रोखावे लागेल नाही तर…”
Indian Chess Star D Gukesh Tania Sachdev Recreates Rohit Sharma Famous Walk After Chess Olympiad 2024 Win
Chess Olympiad 2024: गुकेश-तानियाने चेस ऑलिम्पियाड ट्रॉफीसह रोहित शर्मा स्टाईलमध्ये केलं सेलिब्रेशन, भारतीय बुद्धिबळ संघाचा VIDEO होतोय व्हायरल
Chess Olympiad 2024 India Mens Team Creates History Will Win 1st Ever Gold Medal D Gukesh
Chess Olympiad 2024: चेस ऑलिम्पियाडमध्ये भारतीय पुरूष संघाची ऐतिहासिक कामगिरी, डी. गुकेश, अर्जुन यांच्या बळावर पहिले सुवर्णपदक केले निश्चित
BJP leaders Kuldeep and Bhavya Bishnoi with a group of villagers in their constituency Adampur on Monday. (Express Photo
BJP leaders : हरियाणात भाजपा नेत्यांविरोधात निदर्शनं; शेतकऱ्यांचा रोष भाजपाला भोवणार?
Dodda Ganesh has been sacked as the coach of the Kenya men's national team
माजी भारतीय क्रिकेटपटूची अवघ्या महिनाभरात केनिया संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदावरून हकालपट्टी, अंतर्गत वादाचा फटका

विक्रमजीत पंजाबमधल्या जालंधरजवळच्या चीमा खुर्द गावचा. विक्रमजीत अवघ्या तीन चार वर्षांचा असताना विक्रमजीतच्या कुटुंबीयांनी नेदरलँड्सला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 1980च्या दशकात पंजाबमध्ये निर्माण झालेल्या अस्थिर वातावरण पाहून विक्रमजीतच्या आजोबांनी नेदरलँड्सला रवाना होण्याचा निर्णय घेतला. विक्रमजीतचे वडील हरप्रीत नेदरलँड्समध्ये ट्रान्सपोर्ट कंपनी चालवतात. हरप्रीत पाच वर्षांचे असताना नेदरलँड्सला आले. त्यांना त्रासालाही सामोरं जावं लागलं.

नेदरलँड्सचे सामने पंजाबमध्ये नाहीयेत पण वर्ल्डकपच्या निमित्ताने विक्रमजीतला आपल्या नातेवाईकांना भेटता येणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने U19 वर्ल्डकप जिंकला होता. त्या संघातील कोहलीचा सहकारी तरुवर कोहलीच्या बरोबरीने विक्रमजीत सराव करतो. तरुवर नेदरलँड्समध्ये क्लब क्रिकेट खेळायला आलेलं असताना दोघांची ओळख आणि मैत्री झाली. तरुवरच्या अकादमीत विक्रमजीत खेळाचे बारकावे जाणून घेतो. जालंधरस्थित बीएएस या बॅट तयार करणाऱ्या कंपनीने विक्रमजीतला प्रायोजकत्व दिलं.

विक्रमजीतचे वडील हरप्रीत हेच त्याचे पहिले प्रशिक्षक. ते स्वत:ही खेळायचे. वयोगट स्पर्धांमध्ये, क्लबसाठी चांगली कामगिरी केल्याने नेदरलँडसचा माजी कर्णधार पीटर बोरेनने विक्रमजीतच्या नावाची शिफारस केली. गेल्याच वर्षी विक्रमजीतने वनडे पदार्पण केलं. विक्रमजीतला क्रिकेटच्या बरोबरीने फुटबॉलही खेळायला आवडतं.

वर्ल्डकपसाठी झिम्बाब्वेत आयोजित पात्रता फेरी स्पर्धेत विक्रमजीतने यजमान झिम्बाब्वे आणि नंतर वेस्ट इंडिजविरुद्ध महत्त्वपूर्ण खेळी साकारल्या. अमित उनियाल यांच्या चंदीगढ इथल्या गुरुसागर क्रिकेट अकादमीतही विक्रमजीत सराव करतो. गेले दोन वर्ष विक्रमजीत बरेच महिने सरावासाठी जालंधर इथेच होता. यानिमित्ताने आजोबांबरोबर राहता येतं असं त्याने सांगितलं.

भारत ते नेदरलँड्स व्हाया न्यूझीलंड-तेजाची भरारी

तेजा निधामानुरू हे दाक्षिणात्य नाव नेदरलँड्सच्या संघात आवर्जून दिसेल. आंध्र प्रदेशमधल्या विजयवाडा इथे तेजाचा जन्म झाला. अगदी लहान वयात आईवडिलांबरोबर तो न्यूझीलंडला रवाना झाला. तिथे ऑकलंडसाठी डोमेस्टिक क्रिकेट खेळू लागला.

आईवडील विभक्त झाले. आईने भारतात परतण्याचा निर्णय घेतला. तेजा न्यूझीलंडमध्येच राहिला. त्याने क्रिकेट आणि शिक्षण असं दोन्ही सांभाळलं. पण न्यूझीलंडमध्ये चांगली स्पर्धा असल्यामुळे राष्ट्रीय संघासाठी खेळणं त्याला कठीण वाटू लागलं. स्पोर्ट्स मॅनेजमेंट आणि मार्केटिंगमध्ये त्याने शिक्षण पूर्ण केलं. बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून त्याला नेदरलँड्समध्ये नोकरी मिळाली. त्याची क्रिकेटची आवड स्वस्थ बसू देईना. पंजाब रॉटरडॅम क्लबसाठी तो खेळू लागला. इंग्लंडमधल्या डरहॅम क्लबसाठीही खेळला.

यातूनच त्याचं नेदरलँड्ससाठी खेळायचं स्वप्न पूर्ण झालं. वर्ल्डकपसाठीच्या पात्रता फेरी स्पर्धेत तेजाने वेस्ट इंडिजविरुद्ध झुंजार शतक झळकावलं. नेदरलँड्सला वर्ल्डकपचं तिकीट मिळवून देण्यात तेजाची भूमिका मोलाची आहे. हैदराबाद शहरात घरचे मला खेळताना पाहू शकतील, तो अतिशय आनंदाचा आणि समाधानाचा क्षण असेल असं तेजाने सांगितलं.
आर्यनची फिरकी

आर्यन दत्त पहिल्यांदाच भारतात खेळणार आहे. पंजाबमधलं होशियारपूर हे आर्यनचं गाव. आर्यन ८ वर्षांचा असताना त्याच्या पालकांनी नेदरलँड्सला जाण्याचा निर्णय घेतला. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने वर्ल्डकपवर नाव कोरलं तो क्षण आर्यनसाठी प्रेरणादायी ठरला. फिरकीपटू आर्यन सरावाच्या निमित्ताने चंदीगढला सातत्याने येत असतो. वर्ल्डकपच्या निमित्ताने त्याला इथे खेळण्याचीही संधी मिळणार आहे.

वर्ल्डकपच्या माध्यमातून आर्यनला अनुभवी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनला भेटायचं आहे. फिरकी गोलंदाजीचे बारकावे समजून घ्यायचे आहेत.