भारतीय क्रिकेट संघाचा गेल्या नऊ वर्षापासून सुरु असलेला बाद फेरीचा अडथळा पार करण्याचा प्रयत्न पुन्हा अपुराच पडला आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात केलेल्या निराजनक कामगिरीमुळे भारताचे दुसऱ्यांदा ट्वेन्टी-२० विश्वचषक पटकवण्याचे स्वप्न अधुरे राहिले. जोस बटलर आणि अ‍ॅलेक्स हेल्स यांनी साकारलेल्या अर्धशतकांच्या बळावर उपांत्य फेरीत दहा गडी राखून इंग्लडने भारताचा पराभव केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारताने प्रथम फलंदाजी करत इंग्लंडला १६८ धावांचा आव्हान दिलं होतं. हे आव्हान हेल्स आणि बटलर या सलामीवीरांनी १६ षटकांत पार केलं. हेल्सने ४७ चेंडूत ८६ तर, बटलरने ४९ चेंडूत ८० धावांची खेळी केली. अ‍ॅलेक्स हेल्स हा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. काही महिन्यांपूर्वी हेल्स संघात परतण्याबाबत अनिश्चितता होती. कारण, एका ड्रग्स प्रकरणात अलेक्स हेल्स दोषी ठरला होता. मात्र, विश्वचषकात मिळालेल्या अ‍ॅलेक्स हेल्सने सोनं केलं आहे.

हेही वाचा : पाकिस्तान-इंग्लंड अंतिम सामन्यात पाऊस ठरणार का व्हिलन? जाणून घ्या

२०१९ साली इंग्लंडमध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा सलामीवीर म्हणून अ‍ॅलेक्स हेल्सला संधी मिळाली होती. पण, काही दिवसातच हेल्स ड्रग्ज चाचणीत दोषी आढळल्याचं समोर आलं आणि संघात एकच खळबळ उडाली. त्यानंतर तीन वर्षे आणि दोन विश्वचषक तो संघाबाहेर राहिला. मात्र, आयपीएलसारख्या ट्वेन्टी-२० लीगमध्ये तो खेळत होता.

दरम्यान, सप्टेंबर महिन्यात गोल्फ खेळताना जॉनी बेअरस्टोच्या घोट्याला दुखापत झाली. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेतून तो बाहेर पडला. त्याच्या जागी अ‍ॅलेक्स हेल्सला संधी मिळाली. त्याने भारताविरुद्धच्या सामन्यात ४७ चेंडूत चार चौकार आणि सात षटकारांसह नाबाद ८६ धावा काढत, सामनावीर ठरला.

हेही वाचा : भारताच्या पराभवानंतर रात्री सव्वाबाराला गौतम गंभीरची संभ्रमात टाकणारी पोस्ट; म्हणाला, “तुम्ही केवळ…”

यानंतर बोलताना अ‍ॅलेक्स हेल्स म्हणाला की, “मी पुन्हा ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळेल हे वाटले नव्हते. माझ्या खेळीमुळे मला आनंद झाला आहे. एडिलेड ओवल हे मैदान फलंदाजीसाठी उत्तम आहे. चौकार मारण्यासाठी माझ्याकडे चांगलं मैदान होतं. ऑस्ट्रेलियात खेळण्यासाठी मला आवडते,” असेही अ‍ॅलेक्स हेल्सने सांगितलं.