‘ब्लॅक पर्ल’ नावाने ओळखला जाणारा फुटबॉल विश्वातील अवलिया पेले यांचे राजधानी नवी दिल्लीत जल्लोषात स्वागत झाले. क्रीडा विश्वातल्या या दिग्गजाला पाहण्यासाठी दिल्लीकरांनी प्रचंड गर्दी केली होती. वायू दलातर्फे आयोजित सुब्रतो चषक शालेय स्पर्धेला पेले उपस्थित राहणार आहेत. कोलकाता येथील तीन दिवसीय दौरा आटोपून पेले राजधानीत अवतरले. वायूदल क्रीडा नियंत्रण बोर्डाचे सचिव विजय यादव आणि संचालक सौविक भट्टाचार्य यांनी पेले यांचे स्वागत केले. रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या तीन भारतीय क्रीडापटूंचा पेले यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. १६ ऑक्टोबरला
सुब्रतो चषकाच्या अंतिम लढतीला पेले उपस्थित राहणार आहेत.

Story img Loader