भारतीय महिला आणि पुरुष हॉकी संघ आता नव्या जर्सीसह मैदानात उतरणार आहे. हॉकी इंडियाने आज भारतीय संघाच्या नवीन जर्सीचं अनावरण केलं. पुरुष संघाचा कर्णधार मनप्रीत सिंह आणि महिला संघाची कर्णधार राणी रामपाल यांचं नव्या जर्सीसोबत खास फोटोसेशनही करण्यात आलं. ६ जूनपासून भुवनेश्वरमध्ये रंगणाऱ्या FIH Series Finals स्पर्धेत भारताला पुरुष संघ नव्या जर्सीने मैदानात उतरताना दिसेल. तर महिला संघ १५ जूनपासून जपानमध्ये होणाऱ्या स्पर्धेत नवीन जर्सीसह मैदानात दिसेल.

भारतीय संघाच्या जर्सीमध्ये Home आणि Away सामन्यांसाठी वेगळ्या जर्सीची संकल्पना राबवण्यात आली आहे. घरच्या मैदानावर खेळण्यात येणाऱ्या सामन्यांसाठी भारतीय संघ निळ्या जर्सीने तर बाहेरच्या मैदानावर खेळणाऱ्या सामन्यांसाठी भारतीय संघ पांढरी जर्सी घालणार आहे. खेळाडूंना खेळत असताना, सकारात्मक उर्जा मिळत रहावी आणि सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनाही काहीतरी नवीन पहायला मिळावं यासाठी हा बदल करण्यात आल्याचं हॉकी इंडियाने स्पष्ट केलं आहे.

Story img Loader