‘नो-बॉल’चा एक नवीन नियम आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) काढला आहे. या नियमानुसार गोलंदाजाने गोलंदाजी करताना ‘नॉन-स्ट्राईक’ला असलेल्या फलंदाजाच्या यष्टय़ा उखडल्या, तर पंच तो ‘नो बॉल’ घोषित करतील. यापूर्वी अशा चेंडूला बाद ठरवण्यात येत होता. हा नियम ३० एप्रिल पासून लागू होणार असून कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० या तिन्ही प्रकारात हा नियम लागू करण्यात येईल. तीन मे ला झिम्बाब्वे आणि बांगलादेश यांचा बुलोवायो येथे सामना होणार असून तेव्हापासून हा नवीन नियम लागू होईल.
आणखी वाचा