विश्वचषकापूर्वी खेळाडूंना दुखापत होण्याची मालिका सुरूच आहे. आता न्यूझीलंड क्रिकेट संघाकडून दुखापतीची नवी बातमी समोर आली आहे. न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू डॅरिल मिशेल दुखापतीमुळे तीन देशांच्या तिरंगी मालिकेतून बाहेर पडला आहे. एवढेच नाही तर त्याच्या विश्वचषक खेळण्यावरही संकटाचे ढग दाटून आले आहेत. प्रशिक्षणादरम्यान त्याचे बोट फ्रॅक्चर झाले. जेव्हा त्याला ही दुखापत झाली तेव्हा तो नेटमध्ये फलंदाजी करत होता. एक्स-रे केल्यानंतर असे समजले की, त्याच्या हाताच्या करंगळीला दुखापत झाली आहे.

या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला अंदाजे दोन आठवड्यांचा काळ लागू शकतो. त्याच्या दुखापतीबाबत न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड म्हणाले की, त्याच्या दुखापतीवर आता लक्ष ठेवले जाईल. त्याला काही वेळ लागेल त्यानंतर तो आगामी टी२० विश्वचषकात उपलब्ध होणार की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल. तथापि, त्याच्या बदलीबद्दल अद्याप कोणतीही माहिती आलेली नाही आणि लवकरच न्यूझीलंड क्रिकेटकडून याबद्दल माहिती दिली जाईल.

हेही वाचा :  Women’s T20 Asia Cup:  पाकिस्तानविरुद्ध पराभूत होऊनही भारत गुणतालिकेत अव्वलच; काय आहे गणित, जाणून घ्या! 

ते म्हणाले की या रोमांचक तिरंगी मालिकेपूर्वी डॅरिल मिशेलला दुखापत झाली आहे. टी२० क्रिकेटमध्ये तो आमच्यासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू आहे आणि या तिरंगी मालिकेत आम्हाला त्याची नक्कीच उणीव भासेल. विश्वचषकातील न्यूझीलंडच्या पहिल्या सामन्याला फक्त दोन आठवडे शिल्लक आहेत आणि आम्हाला त्याच्या बदली खेळाडू निवडताना खूप कसरत करावी लागत आहे. पण तोपर्यंत तो दुखापतीतून सावरेल असा मला विश्वास आहे.

हेही वाचा :   बुमराह, रविंद्र जडेजा यांच्याशिवाय भारत टी२० विश्वचषक जिंकू शकतो, रवी शास्त्रींचे मोठे विधान

विश्वचषकापूर्वी न्यूझीलंड, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात तिरंगी मालिका खेळवली जात आहे. न्यूझीलंडचा पहिला सामना शनिवारी हॅगले ओव्हलवर पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. विश्वचषकापूर्वी या तिन्ही संघांना त्यांच्यातील क्षमता ओळखून त्यांच्या उणिवांवर काम करण्याची ही चांगली संधी आहे. ही मालिका ७ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर दरम्यान खेळवली जाणार आहे.

Story img Loader