टी-२० क्रिकेट वर्ल्डकप सुरू होण्यास आता जवळपास दोन महिने शिल्लक राहिले आहेत. ऑक्टोबरमध्ये यूएईत होणाऱ्या या टी-२० वर्ल्डकपसाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. संघांची घोषणा करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. अशातच न्यूझीलंडने या वर्ल्डकपसाठी सर्वप्रथम आपल्या संघाची घोषणा केली.

किवी बोर्डाने वर्ल्डकपसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. ही स्पर्धा १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान आयोजित केली जाणार आहे. संघाची कमान केन विल्यमसनकडे सोपवण्यात आली आहे. विल्यमसनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद विजेतेपदावर कब्जा केला. त्याच वेळी, हा संघ २०१९च्या एकदिवसीय वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पोहोचला.

 

अॅडम मिल्नेला संघात स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर डेव्हन कॉनवे, मार्क कॅम्पमन यांनाही संघात स्थान देण्यात आले आहे. मार्टिन गुप्टिल आणि टिम सेफर्ट यांनी संघाची फलंदाजी अधिक मजबूत केली आहे. रॉस टेलर, कॉलिन डी ग्रँडहोम आणि फिन एलन यांना वगळण्यात आले आहे, परंतु ३४ वर्षीय लेगस्पिनर टॉड एस्टलेसह आणखी दोन फिरकीपटू ईश सोधी आणि मिशेल सॅन्टनर यांची वर्ल्डकपसाठी निवड करण्यात आली आहे.

टी-२० वर्ल्डकपसाठी न्यूझीलंडचा संघ

केन विल्यमसन (कर्णधार), टॉड एश्ले, ट्रेंट बोल्ट, मार्क कॅम्पमन, डेव्हॉन कॉन्वे, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गुप्टिल, काईल जॅमिसन, डेर्ली मिशेल, जिमी निशाम, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर, टिम सेफर्ट, ईश सोधी, टिम साऊदी, एडम मिल्ने.

Story img Loader