New Zealand Biggest Margin Win England: न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अंतिम सामन्यात इंग्लंडचा लाजिरवाणा पराभव केला. सुरूवातीचे दोन सामने जिंकत इंग्लंडने मालिका आपल्या नावे केली होती. मात्र यजमान संघाने शेवटच्या सामन्यात जबरदस्त कामगिरी करत इंग्लंडला पराभवाचा मोठा धक्का दिला. न्यूझीलंडने ४२३ धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. धावांच्या बाबतीत किवी संघाचा कसोटी क्रिकेटमधील हा सर्वात मोठा विजय आहे. याआधीही एकदा न्यूझीलंडने २०१८ मध्ये श्रीलंकेवर ४२३ धावांच्या फरकाने विजय मिळवला होता.

इंग्लंड संघाने ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत मालिका आपल्या नावे केली होती. यानंतर तिसरा सामना हॅमिल्टनमध्ये खेळवला गेला. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे किवी संघाने प्रथम फलंदाजी करताना ३४७ धावा केल्या. किवी संघाकडून मिचेल सँटनरने सर्वाधिक ७६ धावा केल्या. याशिवाय टॉम लॅथमनेही ६३ धावांची चांगली खेळी केली. इंग्लंडकडून मॅथ्यू पॉट्सने सर्वाधिक ४ विकेट घेतले. गस अॅटकिन्सनने ३ विकेट घेतले.

India Beat Ireland by 305 Runs and Registers Biggest Margin Victory in Womens ODI Cricket INDW vs IREW
INDW vs IREW: ऐतिहासिक! भारताच्या महिला संघाने नोंदवला इतिहासातील सर्वात मोठा विजय, आयर्लंडचा उडवला धुव्वा
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
New Zealand announces 15 member squad led by Mitchell Santner for Champions Trophy 2025
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर! केन विल्यमसन नव्हे तर ‘हा’ खेळाडू सांभाळणार धुरा
NZ vs SL Sri Lanka beat New Zealand by 140 runs Mark Chapman 82 runs in 3rd ODI match at Eden Park
NZ vs SL : तिसऱ्या वनडेत श्रीलंकेने उडवला न्यूझीलंडचा धुव्वा, मार्क चॅपमनची खेळी ठरली व्यर्थ
bjp and ajit pawar ncp political conflict over allegations against dhananjay munde
धनंजय मुंडे यांच्या विरोधात भाजपचे सुरेश धस, चित्रा वाघ यांचा बोलविता धनी कोण ?
Yuvraj Singh expresses his feelings on India defeat against New Zealand sports news
न्यूझीलंडविरुद्धचा पराभव सर्वात निराशाजनक; माजी अष्टपैलू युवराज सिंगची भावना
Mohammed Kaif Statement India Defeat Said You will beat Pakistan in Champions Trophy and will act like we are the best
“पाकिस्तानवर विजय मिळवाल अन्…”, भारताच्या कसोटी मालिका पराभवावर माजी क्रिकेटपटूने टीम इंडियाला सुनावलं
Loksatta anvyarth Gautam Gambhir India lose in Test series
अन्वयार्थ: खरेच ‘गंभीर’ आहोत?

हेही वाचा – VIDEO: गुकेशने विश्वविजेतेपदानंतर कोचला दिलेलं वचन केलं पूर्ण, भीतीवर विजय मिळवत केलं थरारक बंजी जंपिंग

पहिल्या डावात प्रत्युत्तरात इंग्लंडची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप झाली. इंग्लंडचा संघ ३५.४ षटकात १३ धावा करत सर्वबाद झाला. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने पहिल्या डावात ४ आणि विल्यम ओ’रुर्क आणि मिचेल सँटनरने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडला २०४ धावांची आघाडी मिळाली.

हेही वाचा – IND vs AUS: ऑस्ट्रेलियाला गाबा कसोटीत मोठा धक्का, ‘या’ गोलंदाजाला नेलं हॉस्पिटलमध्ये; एक षटक टाकताच गेला होता मैदानाबाहेर

न्यूझीलंडने दुसऱ्या डावात शानदार फलंदाजी करत ४५३ धावा केल्या. किवी संघाने तिसऱ्या कसोटीत इंग्लंडसमोर ६५८ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. केन विल्यमसनने सर्वाधिक १५६ धावा केल्या. त्याने २० चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३३ वे कसोटी शतक झळकावले. विल यंग (६०) आणि डॅरिल मिशेल (६०) यांनीही अर्धशतकं झळकावली. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात जेकब बेथेलने सर्वाधिक ३ विकेट घेतले. ६५८ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ केवळ २३४ धावांवर सर्वबाद झाला आणि न्यूझीलंडने ४२३ धावांनी सामना जिंकला. इंग्लंडकडून जेकब बेथेलने सर्वाधिक ७६ धावा केल्या. न्यूझीलंडकडून दुसऱ्या डावात मिचेल सँटनरने सर्वाधिक ४ विकेट घेतले.

हेही वाचा – NZ vs ENG: केन विल्यमसनने शतकासह घडवला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिलाच फलंदाज

टीम साऊदीची निवृत्ती

किवी संघाचा अनुभवी गोलंदाज टीम साऊदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. हा त्याचा अखेरचा कसोटी सामना होता. पदार्पणाच्या सामन्यात ५ विकेट घेत आणि ९ षटकार लगावत आपल्या झंझावाती कारकिर्दीला १७ वर्षांनंतर साऊदीने पूर्णविराम दिला आहे. न्यूझीलंडने अखेरच्या कसोटीत मोठा विजय मिळवत साऊदीला निवृत्तीची खास भेट दिली आहे.

Story img Loader