विदेशी खेळपट्टीवर अपयशी ठरण्याचे सत्र न्यूझीलंडने झिम्बाब्वेसारख्या अननुभवी संघाविरुद्धही कायम राखले. झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय लढतीत विश्वचषक उपविजेत्या संघाला ७ विकेट्सने पराभव पत्करावा लागला. क्रेग एव्‍‌र्हिनच्या नाबाद १३० धावांच्या झंझावाती खेळाच्या जोरावर झिम्बाब्वेने ३०३ धावांचे अशक्यप्राय आव्हान पार केले आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड :  ४ बाद ३०३ (केन विलियम्सन ९७, रॉस टेलर ११२, ग्रँट एलिअट ४३; टिनाशे पन्यांगरा २/५०) पराभूत वि. झिम्बाब्वे : ४९ षटकांत ३ बाद ३०४ (हॅमिल्टन मसकाड्झा ८४, चमू चिभाभा ४२,  क्रेग एव्‍‌र्हिन नाबाद १३०, नॅथन मॅक्युलम ३/६२).

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा