हॅमीश रुदरफोर्ड आणि ब्रेंडान मॅक्युल्लम यांच्या अर्धशतकांच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या ट्वेन्टी-२० लढतीत इंग्लंडवर ५ धावांनी मात केली. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडतर्फे सलामीवीर हॅमीश रुदरफोर्डने ३५ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांसह ६२ धावांची वेगवान खेळी केली. कर्णधार ब्रेंडान मॅक्युल्लमने ४८ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह ६८ धावा फटकावल्या. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ११४ धावांची भागीदारी केली. रॉस टेलरने १९ चेंडूत ३२ तर टॉम लाथमने १९ चेंडूत २२ धावांच्या उपयुक्त खेळी केल्याने न्यूझीलंडने २०१ धावांचा डोंगर उभारला. इंग्लंडतर्फे ल्युक राइटने सर्वाधिक २ बळी टिपले. इंग्लंडला १९६ धावांचीच मजल मारता आली. ल्युक राइटने ३४ चेंडूत ६ चौकार आणि एका षटकारासह ५२ धावांची खेळी केली. अँडी हेल्सने ३९ तर बोपाराने नाबाद ३० धावा केल्या. या विजयासह न्यूझीलंडने दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आह

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा