SL vs NZ Galle Test: न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना गॉल येथे खेळवला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात श्रीलंकेने शानदार फलंदाजी केली. त्यांचे तीन फलंदाज दिनेश चंडिमल, कामिंदू मेंडिस आणि कुसल मेंडिस यांनी शतके झळकावली. या फलंदाजांच्या मदतीने संघाने पहिला डाव ५ बाद ६०२ धावांवर घोषित केला. यानंतर न्यूझीलंड क्रिकेट संघ फलंदाजीला आला आणि संघाचा डाव पत्त्यांसारखा कोसळला आणि संघ ८८ धावांवर ऑल आऊट झाला.

गॉल कसोटीत न्यूझीलंडचा पहिला डाव अवघ्या ८८ धावांवर आटोपला. १० पैकी ९ विकेट श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांनी घेतल्या. ९व्या क्रमांकावर आलेल्या मिचेल सँटनरने न्यूझीलंडकडून २९ धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. संघासाठी शेवटच्या विकेटसाठी २० धावांची सर्वात मोठी भागीदारी झाली. श्रीलंकेसाठी प्रभात जसूर्याने १८ षटकांत ४२ धावा देत ६ विकेट घेतले. तर फिरकीपटू निशान पॅरिसने १७.५ षटकांत 33 धावा देत ३ विकेट घेतले.

IND vs NZ India lost a Test series at home after 12 years
IND vs NZ : पुण्यात पानिपत; १२ वर्षानंतर भारतीय संघाने मायदेशात गमावली कसोटी मालिका
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
IND vs NZ New Zealand set India a target of 359 runs
IND vs NZ : भारताला १२ वर्षांचा विजयरथ कायम राखण्याचे आव्हान, विजयासाठी न्यूझीलंडने दिले ३५९ धावांचे लक्ष्य
Washington Sundar 7 wickets and 5 batters bowled records in IND vs NZ 2nd Test
Washington Sundar : त्रिफळाचीत करत ७ विकेट्स आणि खास पराक्रम
SA vs NZ Women World Cup Final 2024 Highlights
SA vs NZ : क्रिकेट जगताला मिळाला नवा विश्वविजेता! न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेवर मात करत पटकावलं पहिलं जेतेपद
IND vs NZ Rachin Ravindra reveals how CSK helped to him prepare to beat India
IND vs NZ : रचिन रवींद्रने भारताला हरवण्यासाठी केली होती जोरदार तयारी; धोनीच्या संघाने दिली साथ, सामन्यानंतर केला मोठा खुलासा
What Are 5 Big Reasons of India Defeat Against New Zealand in Bengaluru Test IND vs NZ
IND vs NZ: भारताला न्यूझीलंडविरूद्ध का पत्करावा लागला पराभव? काय आहेत टीम इंडियाच्या पराभावाची ५ कारणं?
IND vs NZ Rohit Sharma name has become the embarrassing record
IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर रोहित शर्माला आणखी एक धक्का, नावावर झाली ‘या’ लाजिरवाण्या विक्रमाची नोंद

हेही वाचा – IND vs BAN: विराट कोहली २२ वर्षीय नेट बॉलरकडून सलग दोन वेळा बाद; भेदक गोलंदाजी पाहून विराटने विचारलं, “अरे तू किती…”

Prabath Jayasuriya: प्रभात जयसूर्याची भेदक गोलंदाजी

गॉलच्या मैदानावर जयसूर्याची अप्रतिम फिरकी गोलंदाजी पाहायला मिळाली. त्याने किवी संघाला एकापाठोपाठ एक धक्के दिले. जयसूर्याने कारकिर्दीत ९व्यांदा एका डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. जयसूर्याने तिसऱ्या दिवशी किवी कर्णधार केन विल्यमसनला बाद करून आपल्या संघाला मोठे यश मिळवून दिले. त्यांच्याशिवाय पहिला सामना खेळणाऱ्या निशान पॅरिसने तीन तर असिथा फर्नांडोने १ विकेट घेतली.

हेही वाचा – VIDEO: विराट कोहलीने केली बुमराहची नक्कल, जडेजाने पण दिली साथ; हे पाहून जसप्रीत बुमराहने दिली अशी प्रतिक्रिया

५१४ धावांची आघाडी घेतल्यानंतर श्रीलंकेने न्यूझीलंडला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. एका डावाने सर्वात मोठा पराभव टाळण्यासाठी न्यूझीलंडला किमान १९० धावा कराव्या लागतील. २००२ मध्ये न्यूझीलंडचा पाकिस्तानविरुद्ध एक डाव आणि ३२४ धावांनी पराभव झाला होता. आता पुन्हा अशीच परिस्थिती संघावर ओढवली आहे. पण विल्यमसन डेव्हॉन कॉन्वे यांनी फॉलोऑननंतर संघाचा डाव सावरू पाहत आहेत. न्यूझीलंड संघाला श्रीलंकानंतर तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा दौरा करायचा आहे. तत्त्पूर्वी श्रीलंकेविरूद्ध संघाची झालेली अवस्था नक्कीच किवींसाठी चिंतेचा विषय असणार आहे. भारत वि न्यूझीलंड यांच्यात १६ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरदरम्यान कसोटी मालिका खेळवली जाणार आहे.

श्रीलंका संघाकडे ५१४ धावांची आघाडी

श्रीलंकेला पहिल्या डावात ५१४ धावांची आघाडी मिळाली आहे. कसोटी इतिहासातील पहिल्या डावातील ही ५वी सर्वात मोठी आघाडी आहे. १९३८ मध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर ७०२ धावांची आघाडी घेतली होती. २००६ मध्ये श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेवर ५८७ धावांची आघाडी घेतली होती. न्यूझीलंड संघाने २००२ मध्ये पाकिस्तानविरुद्ध ५७० धावांची आघाडी घेतली होती.