न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पेटल याने भारताविरोधात खेळताना मोठा विक्रम नोंदवला होता. त्याने मागील वर्षी भारत-न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्यात पूर्ण दहा विकेट्स घेतल्या होत्या. भारताचा माजी गोलंदाज अनिल कुंबळे, इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू जीम लॅकर या दोन दिग्गजांनंतर अशी कामगिरी करणार तो तिसरा गोलंदाज आहे. याच एजाज पटेलने भारताविरोधात खेळताना परिधान केलेली जर्सी लिलावाला काढली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >> कॅप्टन विरुद्ध कॅप्टन! श्रेयस अय्यरच्या डायरेक्ट हीटमुळे लखनऊला मोठा झटका, केएल राहुल शून्यावर बाद

एजाज पटेलने कसोटी सामन्यात भारताच्या सर्व म्हणजेच पूर्ण दहा फलंदाजांना बाद केलं होतं. दहाच्या दहा फलंदाजांना बाद केल्यामुळे केल्यामुळे सर्वच भारतीय खेळाडूंनी त्याच्या जर्सीवर सह्या केल्या होत्या. हीच जर्सी एजाज पटेलने विक्रीस काढली आहे. लिलावाच्या माध्यतून ही जर्सी विकून तो मोठे पैसे उभे करणार आहे. तसेच आलेली सर्व रक्कम तो स्टारशीप या लहान मुलांच्या हॉस्पिटलला दान करणार आहे. या जर्सीसाठी ६ मेपासून बोली सुरु झाली असून ११ मेपर्यंत हा लिलाव खुला असणार आहे.

हेही वाचा >> युझवेंद्र चहलने करुन दाखवलं! तीन विकेट्स घेत रचला अनोखा विक्रम, लसिथ मलिंगालाही टाकलं मागे

एजाज पटेलने या लिलावाबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये “आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे. छोटी मुलं आणि त्यांच्या परिवारास मदत करण्यापेक्षा कोणतेही काम मोठे नाही. या लिलावातून जास्तीत जास्त पैसे उभे राहतील अशी मला अपेक्षा आहे. या जर्सीवर सर्व भारतीय खेळाडूंच्या सह्या आहेत,” असे एजाजने म्हटले आहे.