Kane Williamson ruled out World Cup first match: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ पूर्वी न्यूझीलंडला कर्णधार केन विल्यमसनच्या रूपाने मोठा धक्का बसला आहे. किवी कर्णधार इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यातून आधीच बाहेर पडला आहे. वास्तविक, विल्यमसन गुडघ्याच्या दुखापतीमुळे विश्वचषकातील पहिला सामना खेळू शकणार नाही. आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात विल्यमसनला दुखापत झाली होती. विश्वचषकाचा पहिला सामना गतविजेता इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंग्लंडविरुद्ध टॉम लॅथम सांभाळणार किवी संघाची धुरा –

केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत टॉम लॅथम ५ ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे होणाऱ्या विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध न्यूझीलंडचे नेतृत्व करेल. लॅथम दोन सराव सामन्यांमध्येही संघाचे नेतृत्व करणार आहे. केन विल्यमसनने ९ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड विरुद्ध नेदरलँड्स विरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या विश्वचषक सामन्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त होण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड म्हणाले की, ‘केनच्या सामन्यात पुनरागमन करण्याबाबत आम्ही सुरुवातीपासूनच दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवला आहे. त्याची रिकव्हरी चांगल्या पद्धतीने होत आहे. आता तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या आव्हानाचा आणि तीव्रतेचा सामना करू शकेल याची खात्री करणे एवढेच आहे. आम्ही केनच्या रिकव्हरीसाठी दिवसेंदिवस एक पध्दत सुरू ठेवू. तसेच त्याच्यावर परत येण्यासाठी नक्कीच कोणताही दबाव आणणार नाही.’

हेही वाचा – VIDEO: ‘भारतातील ‘या’ दोन शहरात पाकिस्तान संघाला मिळणार जास्त पाठिंबा’; माजी क्रिकेटपटू मुश्ताक अहमदचं मोठं वक्तव्य

केन विल्यमसन आयपीएल २०२३ च्या सुरुवातीच्या सामन्यात अँटीरियर क्रूसिएट लिगामेंट (एसीएल) फाटणे आणि शस्त्रक्रियेनंतर ६ महिन्यांच्या विश्रांतीनंतर परत येत आहे. केन विल्यमसनने इंग्लंडमध्ये राष्ट्रीय संघासोबत रिकव्हरी सुरू ठेवले आणि विश्वचषक सराव सामन्यांमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती.

हेही वाचा – Asian Games: भारताला सहाव्या दिवशी नेमबाजीत दोन सुवर्णांसह मिळाली पाच पदकं, ऐश्वर्य प्रताप सिंगने पटकावले रौप्यपदक

केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द –

विल्यमसनने आतापर्यंत ९४ कसोटी, १६१ एकदिवसीय आणि ८७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटीमध्ये त्याने ५४.८९ च्या सरासरीने ८१२४ धावा केल्या आहेत, ज्यात २८ शतके आणि ३३ अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय, वनडेच्या १५३ डावांमध्ये त्याने ४७.८३च्या सरासरीने ६५५४ धावा केल्या आहेत, ज्यात १३ शतके आणि ४३ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० च्या ८५ डावात २४६४ धावा केल्या आहेत, ज्यात १७ अर्धशतकांचा समावेश आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New zealand captain kane williamson has been ruled out of the first world cup 2023 match against england vbm
Show comments