माऊंट मॉंगानुई : न्यूझीलंडला शनिवारी पहिल्या दिवस-रात्र क्रिकेट कसोटीच्या तिसऱ्या दिवशी विजयासाठी ३९४ धावांचे आव्हान दिल्यानंतर वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या (२१ धावांत चार बळी) भेदक माऱ्यामुळे इंग्लंडचा संघ विजयापासून केवळ पाच बळी दूर आहे. जो रूट, हॅरी ब्रुक आणि बेन फोक्स यांच्या वेगवान अर्धशतकी खेळींच्या बळावर इंग्लंडने दुसऱ्या डावात जलदगतीने धावा केल्या आणि त्यामुळे संघाने ३७४ धावा करत एकूण ३९३ धावांची आघाडी मिळवली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ब्रॉडने न्यूझीलंडच्या डेव्हॉन कॉन्वे (२), केन विल्यम्सन (०), टॉम लॅथम (१५) आणि पहिल्या डावातील शतकवीर टॉम ब्लंडेल (१) यांना बाद केले. ब्लंडेल माघारी परतल्यानंतर न्यूझीलंडची अवस्था ५ बाद २८ अशी बिकट झाली. यानंतर मात्र त्यांनी गडी गमावले नाही. त्यामुळे दिवसअखेर त्यांनी ५ बाद ६३ अशी मजल मारली. संघाला अजूनही विजयासाठी ३३१ धावांची आवश्यकता आहे. डॅरेल मिचेल (नाबाद १३) आणि मायकल ब्रेसवेल (नाबाद २५) खेळत आहेत.

त्यापूर्वी, तिसऱ्या दिवशी इंग्लंडने २ बाद ७९ धावसंख्येच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. रूट (६२ चेंडूंत ५७ धावा), ब्रुक (४१ चेंडूंत ५४ धावा) व फोक्स (८० चेंडूंत ५१ धावा) यांनी चमकदार कामगिरी केली. याशिवाय ओली पोप (४९), बेन स्टोक्स (३१) आणि ऑली रॉबिन्सन (३९) यांनीही आपले योगदान दिले. पोप, रूट आणि ब्रुकच्या मदतीने इंग्लंडने पहिल्या सत्रात १५८ धावा केल्या. न्यूझीलंडकडून मायकल ब्रेसवेलने (३/६८)चांगली गोलंदाजी केली.