न्यूझीलंडविरुद्धची पहिली कसोटी झटपट जिंकण्याच्या उद्देशाने आफ्रिकेने आपला पहिला डाव ८ बाद ३४७ धावांवर घोषित केला. न्यूझीलंडला डावाच्या पराभवाने नमवण्याच्या हेतूने मैदानात उतरलेल्या आफ्रिकेच्या संघासमोर डीन ब्राऊलिनने चिवट झुंज दिली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडच्या ४ बाद १६९ धावा झाल्या आहेत. ब्राऊलिन ६९ तर ब्रॅडले वॉटलिंग १० धावांवर खेळत आहेत.
दरम्यान, ३ बाद २५२ वरून पुढे खेळणाऱ्या आफ्रिकेने गुरुवारी केवळ ९५ धावांची भर घालत डाव सोडला. शतकवीर अल्विरो पीटरसन केवळ तीन धावांची भर घालून बोल्टच्या गोलंदाजीवर बाद झाला. एबी डीव्हिलियर्सने ६७ धावांची खेळी केली. न्यूझीलंडतर्फे ट्रेंट बोल्ट आणि ख्रिस मार्टिनने प्रत्येकी ३ बळी टिपले. न्यूझीलंडचा संघ अजूनही १३३ धावांनी पिछाडीवर आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in