माजी कर्णधार रॉस टेलरने केलेल्या शानदार शतकामुळेच न्यूझीलंडला वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ६ बाद ३०७ धावांची मजल गाठता आली. नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडची एक वेळ २ बाद २४ अशी दयनीय स्थिती होती. तथापि, टेलरने केन विल्यम्सन याच्यासोबत तिसऱ्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारी करीत संघाचा डाव सावरला. विल्यम्सनने सहा चौकार व एक षटकारासह ४५ धावा केल्या. त्यानंतर टेलर याने ब्रॅन्डन मॅक्क्युलम (३७) याच्या साथीने ७७ धावा तर कोरी अँडरसन (३८) याच्यासह ६८ धावांची भागीदारी केली. एका बाजूने शैलीदार शतक करणाऱ्या टेलरने १५ चौकारांसह १२९ धावा केल्या.

Story img Loader