पुढील वर्षीच्या अखेरीस न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) विश्वसनीय सूत्रांनी दिली. सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असलेला भारतीय संघ त्यानंतर न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे.
‘‘पुढील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आम्ही न्यूझीलंडला भारत दौऱ्यासाठी आमंत्रित केले आहे,’’ असे बीसीसीआयच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) भविष्यातील दौऱ्यांच्या कार्यक्रमानुसार, वेस्ट इंडिजचा संघ २०१४-१५मध्ये भारत दौऱ्यावर येणार होता. परंतु सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीनिमित्ताने भारतात झालेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी विंडीज संघाला नोव्हेंबरमध्ये बोलावण्यात आले होते. त्यामुळे आगामी रिक्त झालेल्या जागेसाठी किवी संघाचा विचार करण्यात येत आहे.

Story img Loader