पीटर फुल्टनच्या शानदार शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी दमदार सुरुवात केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडच्या १ बाद २५० धावा झाल्या आहेत. नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र याचा फायदा उठवला न्यूझीलंडच्या फलंदाजांनी. पीटर फुल्टन आणि हॅमीश रुदरफोर्ड या सलामीवीरांनी ७९ धावांची सलामी दिली. स्टीव्हन फिनने रुदरफोर्डला ३७ धावांवर बाद करत ही जोडी फोडली. यानंतर फुल्टन आणि केन विल्यमसन यांनी दुसऱ्या विकेटसाठी नाबाद १७१ धावांची भागीदारी केली. या भागीदारी दरम्यान माँटी पानेसरच्या गोलंदाजीवर एक धाव घेत फुल्टनने कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. विल्यमसनने आपले अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी विकेट्सची पडझड टाळली आणि मात्र त्यांना धावगती वाढवता आली नाही. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा फुल्टन १२४, तर विल्यमसन ८३ धावांवर खेळत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा