नील व्ॉग्नर आणि ब्रूस मार्टिन यांच्या गोलंदाजीसमोर इंग्लंडचा पहिला डाव १६७ धावांवर संपुष्टात आला. दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडने बिनबाद १३१ धावा अशी सुरेख सुरुवात करत पहिल्या कसोटी सामन्यावर घट्ट पकड मिळवली आहे.
न्यूझीलंडच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर बलाढय़ इंग्लंडची फलंदाजी पत्त्याच्या डावाप्रमाणे कोसळली. खराब फटकेबाजीचा फटका इंग्लंडला बसला. त्यामुळे पहिल्या दोन सत्रांतच इंग्लंडचा डाव गडगडला. खराब हवामानामुळे पहिल्या दिवसाचा खेळ होऊ शकला नव्हता. जोनाथन ट्रॉट (४५) वगळता इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नाही. न्यूझीलंडकडून व्ॉग्नर आणि मार्टिन यांनी प्रत्येकी चार बळी मिळवले. प्रत्युत्तरादाखल, न्यूझीलंडने एकही बळी न गमावता सुरेख सुरुवात केली आहे. पदार्पणाच्या सामन्यात हमीश रुदरफोर्ड (खेळत आहे ७७) याने अर्धशतक झळकावले आहे. रुदरफोर्ड आणि पीटर फुल्टन (खेळत आहे ४६) यांनी पहिल्या विकेटसाठी १३१ धावांची अभेद्य भागीदारी रचली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा