PAK vs NZ Champions Trophy Match Highlights in Marathi: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ला दणक्यात सुरूवात झाली आहे. या सामन्याचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. पाकिस्तानच्या कराची नॅशनल स्टेडियमवर पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला सामना खेळवला गेला, ज्यात पाकिस्तानला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.
तत्पूर्वी, भव्य उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांनी एअर शो आणि स्टंट केले. मात्र आकाशात अचानक लढाऊ विमाने दिसू लागल्याने त्यांच्या कर्णकर्कश आवाजाने खेळाडू आणि चाहते दचकले. तर न्यूझीलंडचे खेळाडू घाबरले असल्याचा व्हीडिओही व्हायरल होत आहे.
पाकिस्तानी वायुसेनेने उद्घाटन सोहळ्याची भव्यता वाढवली. तब्बल २९ वर्षांच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर पाकिस्तानमध्ये आयसीसी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या भव्य कार्यक्रमादरम्यान हवाई दलाची युद्ध विमाने आकाशात स्टंट करताना दिसली. न्यूझीलंडचा खेळाडू डेव्हॉन कॉन्वे सीमारेषेबाहेर फलंदाजीसाठी तयार असतानाच, कराचीतील स्टेडियमच्या वर अनेक विमाने उडताना दिसली, अचानक आवाज आल्याने कॉन्वे घाबरून खाली वाकला.
विमानाचा आवाज ऐकून कॉन्वे खाली वाकला. तर त्याच्याबरोबर तिथे उपस्थित असलेले ग्लेन फिलिप्स आणि मार्क चॅपमन यांनाही नेमकं काय झालं काही समजलं नाही. नंतर तिन्ही खेळाडू दचकल्यावर एकमेकांना पाहून हसताना दिसले. तर चाहतेही विमानाच्या आवाजाने घाबरले.
पाकिस्तान संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडविरूद्ध ६० धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. न्यूझीलंडकडून विल यंग, टॉम लॅथम यांनी शतकी खेळी केली तर ग्लेन फिलिप्सने ६१ धावांची वादळी खेळी केली आणि संघाने अशीरितीने ३२० धावांचा टप्पा गाठला. पाकिस्तानने ३२१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना फार संथ सुरूवात केली. याचा फटका संघाला बसला आणि परिणामी पराभवही पत्करावा लागला.
बाबर आझमने अर्धशतकी खेळी केली, पण फार संथ खेळी केल्याने त्याला चाहत्यांचा रोष पत्करावा लागला. सलामीवीर सौद शकील चौथ्याच षटकातच पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर १०व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कर्णधार मोहम्मद रिझवानला ग्लेन फिलिप्सने झेलबाद केले. पाकिस्तानला पहिल्या १० षटकांत केवळ २२ धावा करता आल्या. यादरम्यान बाबर आझमने एका टोकाला धरून अर्धशतक झळकावले पण १५३ धावांच्या स्कोअरवर तो ६४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. बाबरला मिचेल सँटनरने बाद केले.
Scenes at National Stadium Karachi. A flypast of Pakistan Air Force F-16's
— Developing Pakistan (@developingpak) February 19, 2025
© Salman Zaidi #Karachi #NationalStadiumKarachi #ICCChampionsTrophy #iccchampionstrophy2025 #ChampionsTrophy #ChampionsTrophy2025 #championstrophy2025Pakistan #PAF #PakistanAirForce ???? pic.twitter.com/KVttij7bUU
Pakistan Air Force Show Scares New Zealand Players In Karachi#NZvsPAK #PakvsNz #ChampionsTrophy2025 pic.twitter.com/Scjh7hxevx
— introvert idiots (@introvertidiots) February 19, 2025
Pakistan Organised An Air Show Before The First Match But This Kid Thought It Was Something Else pic.twitter.com/AgAMtCkZ92
— Hilarious Haveli (@hilarioushavel) February 19, 2025
पाकिस्तानने अवघ्या २०० धावांत ७ विकेट गमावल्या होत्या. यानंतर खुशदिल शाहने टी-२अंदाजात फलंदाजी करत ३८ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले पण दुसऱ्या टोकाला त्याला मजबूत साथ मिळू शकली नाही आणि शेवटी ४९ चेंडूत ६९ धावा करून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर काही वेळातच पाकिस्तानचा संपूर्ण संघ २६० धावांवर आटोपला आणि न्यूझीलंडने ६० धावांनी सामना जिंकला.