NZ vs SA Highlights in Marathi: दक्षिण आफ्रिका वि. न्यूझीलंड उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडने संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात लाहोरच्या मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्याची नाणेफेक न्यूझीलंड संघाने जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय अगदी योग्य असल्याचे सिद्ध करत ऐतिहासिक धावसंख्या उभारली आहे.
मिचेल सँटरनच्या नेतृत्त्वाखालील संघाने उपांत्य फेरीत ६ बाद ३६२ धावा केल्या आहेत. यामध्ये सर्वात मोठं योगदान रचिन रविंद्र आणि केन विल्यमसन यांच्या १५० अधिक धावांच्या भागीदारीचे आहे. सलामीवीर रचिन रविंद्र आणि केन विल्यमसन या दोघांनीही आपआपली शतकं झळकावली आणि संघाला चांगल्या धावसंख्येचा पाया रचण्यात मदत केली.
रचिन रवींद्रने आधी १०१ चेंडूत १३ चौकार आणि एका षटकारासह १०८ धावा केल्या आणि संघाला मोठ्या धावसंख्येचा पाया रचून दिला. तर यानंतर केन विल्यमसननेही त्याचे १५वे वनडे शतक झळकावले आहे. विल्यसमन ९४ चेंडूत १० चौकार आणि २ षटकारांसह १०२ धावा करत बाद झाला.
विल्यमसन आणि रचिनच्या शतकानंतर डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलीप्स यांनी ४९-४९ धावांची वादळी खेळी केली. मिचेल ३७ चेंडूत१ षटकार आणि ४ चौकार लगावले. तर फिलीप्सने २७ चेंडूत १ षटकार आणि ६ चौकारांसह ४९ धावा केल्या तर ब्रेसवेलने दोन दणदणीत चौकार लगावत संघाची धावसंख्या ३६२ धावांवर नेऊन ठेवली.
चॅम्पियन्स ट्रॉफीमधील पहिल्या डावातील सर्वोच्च धावसंख्या
३६२/६ – न्यूझीलंड वि दक्षिण आफ्रिका, लाहोर, २०२५ सेमीफायनल
३५१/८ – इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया, लाहोर, २०२५ (पराभूत)
३४७/४ – न्यूझीलंड वि अमेरिका, ओव्हल, २०१७
३३८/४ – पाकिस्तान वि. भारत, ओव्हल, २०१७ अंतिम सामना
३३१/७ – भारत वि. दक्षिण आफ्रिका, कार्डिफ, २०१३