भारताविरुद्ध मालिकेसाठी न्यूझीलंडने आज आपल्या संघाची घोषणा केली आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने केवळ ९ खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. उर्वरित ६ खेळाडू हे सध्या भारताविरुद्ध सुरु असलेल्या न्यूझीलंड ‘अ’ संघामधून भरवले जाणार आहे. सध्या न्यूझीलंड ‘अ’ संघ भारत दौऱ्यावर आहे.

२२ ऑक्टोबरपासून न्यूझीलंडच्या भारत दौऱ्याला सुरुवात होणार आहे. पहिला वन-डे सामना हा मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवला जाणार आहे. यानंतर पुणे आणि कानपूर येथेही वन-डे सामने खेळवले जाणार आहेत.

अवश्य वाचा – रोहित शर्मा ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक षटकार ठोकणारा खेळाडू

निल ब्रूम आणि जिमी निशम या दोन खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलेलं नाहीये. भारतीय दौऱ्यासाठी न्यूझीलंडच्या क्रिकेट बोर्डाने हा खास प्रयोग करण्याचं ठरवलं आहे.

असा असेल भारत दौऱ्यासाठी न्यूझीलंडचा संघ –

मार्टीन गप्टील, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), केन विल्यमसन (कर्णधार), रॉस टेलर, कोलीन डी ग्रँडहोम, मिचेल सँटनर, टीम साऊदी, अॅडम मिलने, ट्रेंट बोल्ट

अवश्य वाचा – Video: मनिष पांडेचा हा झेल पाहिलात का?

Story img Loader