भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर रविवारी (२२ जानेवारी) झालेल्या क्रॉसओव्हर सामन्यात भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून शूटआऊटमध्ये ४-५ असा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे टीम इंडिया हॉकी वर्ल्ड कप २०२३ मधून बाहेर पडली आहे. या पराभवामुळे टीम इंडियाचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पुन्हा भंगले.

१९७५ मध्ये भारताने शेवटचा आणि एकमेव हॉकी विश्वचषक जिंकला होता. तसं पाहिलं तर मोठ्या स्पर्धांमध्ये न्यूझीलंड भारताला नेहमीच मात देत आला आहे.

Akash Deep has revealed How Virat Kohli gifted his bat that saved Gabba Test for India
Virat Kohli : ‘मी बॅट मागितली नव्हती, त्यानेच…’, गाबा कसोटी वाचवणाऱ्या आकाशदीपचा विराटच्या बॅटबद्दल मोठा खुलासा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
ojas kulkarni of kolhapur participated in first world cup kho kh
ऑस्ट्रेलियन खो-खोची ‘ओजस्वी’ कहाणी! खेळ माहीत नसलेल्या देशाचा भारतीय ‘द्रोणाचार्य’
BCCI New Rule Team India Players May Receive Performance based variable pay After Test Defeat
टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरूद्धचा पराभव पडणार भारी; थेट पगारावर परिणाम होणार? BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Kho-Kho World Cup Delhi, Kho-Kho ,
विश्लेषण : दिल्लीत चक्क खो-खो विश्वचषक? किती संघ सहभागी? स्पर्धेमुळे या मराठमोळ्या खेळाला संजीवनी मिळेल?
Karun Nair ready to make a comeback to Indian team after scored 4 consecutive centuries in Vijay Hazare Trophy 2024-25
Karun Nair : त्रिशतकवीर आठ वर्षानंतर पुनरागमनासाठी सज्ज! सलग चार शतकं झळकावत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
cm devendra fadnavis address party workers at bjp state convention
सत्तेमुळे सुखासीन झाल्यास जनतेशी द्रोह ठरेल! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे परखड मतप्रदर्शन
New Zealand announces 15 member squad led by Mitchell Santner for Champions Trophy 2025
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर! केन विल्यमसन नव्हे तर ‘हा’ खेळाडू सांभाळणार धुरा

वनडे विश्वचषक २०१९ च्या उपांत्य फेरीतील पराभव –

क्रिकेट असो की हॉकी, महत्त्वाच्या सामन्यांमध्ये न्यूझीलंडसमोर टीम इंडियाला अनेक वेळा पराभव पत्करावा लागला आहे. २०१९ मध्ये इंग्लंडमध्ये खेळलेला एकदिवसीय विश्वचषक कोण विसरू शकेल. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जबरदस्त खेळ दाखवत त्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले होत. उपांत्य फेरीत भारताचा सामना न्यूझीलंडशी झाला. भारत न्यूझीलंडवर मात करू शकेल, असे चाहत्यांना वाटत होते, पण घडले उलटे. मँचेस्टरमध्ये झालेल्या त्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला १८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. तो सामना महान कर्णधार एमएस धोनीचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला.

टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातही पराभव –

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या सत्राच्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने आले होते. त्या सामन्यात ही किवींनी आठ गडी राखून विजय मिळवला. २०२१ साली इंग्लंडमधील साउथम्प्टन येथे झालेल्या सामन्यात भारतीय संघ पहिल्या डावात केवळ २१७ धावाच करू शकला होता. यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दमदार पुनरागमन करत किवी संघाला २४९ धावांत गुंडाळले. भारताचा दुसरा डाव केवळ १७० धावांत संपुष्टात आला. त्यामुळे न्यूझीलंडला १४९ धावांचे सोपे लक्ष्य मिळाले.

हेही वाचा – Rawalpindi Express: शोएब अख्तरने त्याचा बायोपिक बनवणाऱ्या निर्मात्याला दिली धमकी; जाणून घ्या काय आहे प्रकरण

२००० च्या बाद फेरीच्या अंतिम फेरीत पराभव –

२००० च्या आयसीसी बाद फेरीच्या अंतिम फेरीतही न्यूझीलंडने भारतीय चाहत्यांची मने मोडली होती. नैरोबी येथे झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने कर्णधार सौरव गांगुलीच्या ११७ आणि सचिन तेंडुलकरच्या ६९ धावांच्या जोरावर ५० षटकात ६ बाद २६४ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ पाच गड्यांच्या मोबदल्यात १३२ धावा करून एकवेळ अडचणीत सापडला होता. पण, अष्टपैलू ख्रिस केर्न्सने नाबाद १०२ धावा करत किवी संघाला चार गडी आणि दोन चेंडू राखून विजय मिळवून दिला.

टी-२० विश्वचषक २०२१ मधील पराभव –

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवामुळे भारतीय संघाच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा मावळल्या. दुबईत खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाला २० षटकात ७ विकेट गमावत केवळ ११० धावा करता आल्या होत्या. प्रत्युत्तरात किवी संघाने १४.३ षटकांतच लक्ष्य गाठले. त्याआधी २०१६ आणि २००७ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्येही न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता. इतकेच नाही तर १९७५, १९७९, १९९२ आणि १९९९ च्या वनडे वर्ल्ड कपमध्येही भारतीय संघ न्यूझीलंडकडून हरला होता.

हेही वाचा – पुरुष विश्वचषक हॉकी स्पर्धा : भारताचा पुन्हा स्वप्नभंग

हॉकी विश्वचषकात तिसऱ्यांदा स्वप्न भंगले –

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हॉकी विश्वचषकाच्या इतिहासातील हा सातवा सामना होता. याआधी दोन्ही देशांदरम्यान ६ सामने झाले, ज्यामध्ये भारताने ३ आणि किवी संघाने २ जिंकले. यादरम्यान १९८६ आणि २००२ च्या विश्वचषकात न्यूझीलंडने भारताचा २-१ अशा फरकाने पराभव केला होता. त्याच वेळी, भारतीय संघ १९९८ च्या विश्वचषक स्पर्धेत दोन वेळा आणि १९८२ च्या विश्वचषकात किवींविरुद्ध विजय मिळवण्यात यशस्वी ठरला होता. तर १९७३ च्या विश्वचषका

Story img Loader