Amelia Kerr Youngest Double Ton Scorer: न्यूझीलंडची अष्टपैलू क्रिकेटपटू अॅमेलिया केरने बुधवारी क्रिकेटमध्ये विश्वविक्रमाला गवसणी घातली. अवघ्या १७ व्या वर्षी अॅमेलियाने वन डेत द्विशतक ठोकले असून १४५ चेंडूत ३१ चौकार आणि दोन षटकारांची बरसात करत अॅमेलियाने नाबाद २३२ धावा ठोकल्या. यानंतर अॅमेलियाने गोलंदाजीतही कमाल दाखवत आयर्लंडच्या पाच फलंदाजांना माघारी पाठवून संघाला सहज मिळवून दिला. पुरुष आणि महिलांमध्ये वन डेमध्ये इतक्या कमी वयात (१७वर्ष २४३ दिवस) द्विशतक ठोकणारी ती पहिली क्रिकेटपटू ठरली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बुधवारी डबलिन येथे न्यूझीलंड विरुद्ध आयर्लंड हा सामना रंगला. न्यूझीलंडच्या महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीला आलेल्या केरने अॅमी सॅदरवेटच्या साथीने संघाला चांगली सुरुवात केली. सुरुवातीला केरने सावध फलंदाजी करत अॅमीला साथ दिली. केरने ४५ चेंडूत अर्धशतक ठोकले. मात्र, अॅमी ४५ चेंडूत ६१ धावा काढून माघारी परतली आणि मग केर आक्रमक झाली. तिने शतक ठोकले ते ७७ चेंडूंमध्ये. यानंतर केरने अक्षरश: धावांची बरसात केली. १३४ चेंडूंमध्ये तिने दोनशे धावा केल्या. केरने १४५ चेंडूंमध्ये २३२ धावा केल्या. यात ३१ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. यात तिचा स्ट्राईक रेट १६० इतका होता. केरला कॅस्परेककडून मोलाची साथ मिळाली. कॅस्परेकने ११३ धावांची खेळी केली. या जोरावर न्यूझीलंडने ५० षटकांत ३ विकेटच्या मोबदल्यात ४४० धावांचा डोंगर उभा केला.

फलंदाजीनंतर केरने गोलंदाजीतही चकम दाखवली. तिने ७ षटकांत १७ धावांच्या मोबदल्यात आयर्लंडच्या ५ फलंदाजांना माघारी पाठवले. केरच्या माऱ्यासमोर आयलर्डंचा डाव १३५ धावांवर आटोपला आणि न्यूझीलंडने ३०५ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

महिला क्रिकेटमध्ये वन डेत दोनशे धावा ठोकण्याचा विक्रम यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्कने केला होता. तिने १९९७ मध्ये डेन्मार्कविरुद्ध २२९ धावा केल्या होत्या. म्हणजेच केरचा जन्म होण्यापूर्वी हा विक्रम झाला होता.

महिला क्रिकेटमध्ये वन डेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
अॅमेलिया केर (न्यूझीलंड) – नाबाद २३२ धावा Vs आयर्लंड – १३ जून २०१८
बेलिंडा क्लार्क (ऑस्ट्रेलिया)- नाबाद २२९ धावा Vs डेन्मार्क – १६ डिसेंबर १९९७
दिप्ती शर्मा (भारत) – १८८ धावा Vs आयर्लंड – १५ मे २०१७
चामरी अटापट्टू (श्रीलंका) – नाबाद १७८ धावा Vs ऑस्ट्रेलिया – २९ जून २०१७
शॅर्लोट एडवर्ड्स (इंग्लंड) – नाबाद १७३ धावा Vs आयर्लंड – १६ डिसेंबर १९९७