न्यूझीलंडमध्ये साऊथ आयलँडवरील ख्राइस्टचर्च शहरात शुक्रवारी सकाळी दोन मशीदींमध्ये गोळीबार करण्यात आला. मशिदीत करण्यात आलेल्या या गोळीबारात ४९ निष्पाप नागरीकांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी झाले. या हल्ल्यात दोन भारतीय जखमी झाले असून नऊ जण बेपत्ता आहेत. संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर जेव्हा मशिदीत गर्दी होती, तेव्हा हा गोळीबार करण्यात आला. हल्ला केल्यानंतर हल्लेखोराने घटनास्थळावरुन पळ काढला होता. या सोबतच हल्लेखोराने लाईव्ह स्ट्रिमिंगदेखील केलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून यात तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. याशिवाय, ख्राईस्टचर्चच्या वेगवेगळया भागात कारमध्ये स्फोटके सापडली होती. ही सर्व स्फोटके निकामी करण्यात आली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या हल्ल्यानंतर स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिने ट्विट करत या घटनेबाबत दुःख व्यक्त केले. ख्राईस्टचर्च असा शब्द लिहून तिने तीन दुःखद भावना व्यक्त करणारे ईमोजी वापरत याबाबत ट्विट केले आहे.

मात्र या ट्विटनंतर तिच्यावर नेटिझन्सने जोरदार टीका केली. तसेच तिला ट्रोल करत इतक्या गंभीर घटनांसाठी ईमोजी वापरणे कितपत योग्य आहे? असा सवाल देखील केला. सानियाने हेच दुःख किंवा निषेध पुलवामा किंवा मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या वेळी का व्यक्त केला नाही? असे प्रश्नही तिला विचारण्यात आले.

सानियाने पुलवामा हल्ल्यानंतर आपल्या भावना एक फोटो-ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केल्या होत्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New zealand terror attack sania mirza trolled for tweet on christchurch shooting