३ सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-१ अशी बरोबरी साधल्यानंतर भारतीय संघ थिरुअनंतपुरम येथील अखेरच्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. या सामन्यावर मालिकेचं भवितव्य अवलंबून असणार आहे, त्यामुळे या सामन्यात विजय मिळवणं दोन्ही संघांसाठी तितकच अनिवार्य आहे. त्यामुळे साहजिकच या सामन्याआधी दोन्ही संघ चांगलेच तणावात असणार आहेत. मात्र विराट कोहली आणि त्याच्या साथीदारांनी हा सर्व ताण विसरुन, सामन्याच्या एक दिवस आधी धमालमस्ती केली.
विराटने आपल्या सहकाऱ्यांसोबत शूट केलेला बूमरँग व्हिडीओ आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.
अवश्य वाचा – धोनीने संघातली आपली जागा ओळखावी, विरेंद्र सेहवागचा सल्ला
One from last night, chilling with the boys! @SDhawan25 @hardikpandya7 pic.twitter.com/1qLzvWYdtf
— Virat Kohli (@imVkohli) November 7, 2017
तर दुसरीकडे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही थिरुअनंतपुरम येथील श्रीवेल्लम परसुरामा मंदिराला भेट दिली. यावेळी रवी शास्त्री यांनी काहीकाळ मंदिरात शांत बसून ध्यानही केलं. तसेच शास्त्रींनी आपल्या संघाच्या विजयासाठी या मंदीरात पुजाआर्चाही केल्याचं समजतंय.
अवश्य वाचा – नाश्ता आणि जेवणात काय खातो विराट कोहली? जाणून घ्या विराटचा डाएट प्लान
या सामन्यात भारताने विजय मिळवल्यास वन-डे पाठोपाठ टी-२० मालिकाही भारताच्या नावे होईल. या विजयाचा फायदा भारताला आयसीसीच्या क्रमवारीत आपलं स्थान सुधारण्यासाठी होणार आहे. त्यामुळे या सामन्यात विराट कोहलीचा भारतीय संघ कशी कामगिरी करतोय हे पहावं लागणार आहे.
अवश्य वाचा – निर्णायक लढतीत धोनीवर लक्ष