लाहोर : गुणवान खेळाडूंची मोठी संख्या असूनही ‘आयसीसी’ स्पर्धांत जेतेपदापासून दूर राहणारे न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका हे तुल्यबळ संघ चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य लढतीत आज, बुधवारी आमनेसामने येणार आहेत. हा सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियम येथे रंगणार आहे. या स्टेडियमवरील गेला सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. मात्र, उपांत्य लढतीदरम्यान पावसाचा अडथळा अपेक्षित नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या संघांनी अनुक्रमे १९९८ आणि २००० अशी एकेकदा ही स्पर्धा जिंकली आहे. मात्र, त्यावेळी या स्पर्धेचे ‘आयसीसी नॉकआऊट करंडक’ असे नाव होते. या स्पर्धेचे ‘चॅम्पियन्स करंडक’ असे नामकरण झाल्यापासून दोनही संघ जेतेपदापर्यंत पोहचू शकलेले नाहीत.

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेपूर्वी पाकिस्तानात झालेल्या तिरंगी मालिकेत न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला नमवले होते. याचा न्यूझीलंडला फायदा मिळू शकेल.

क्लासन, रबाडाकडे लक्ष

यंदाच्या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने तीनपैकी दोन साखळी सामने जिंकले, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने पाच गुणांसह ‘ब’ गटात अग्रस्थान मिळवले होते. आता दक्षिण आफ्रिकेला यशस्वी वाटचाल सुरू राखायची झाल्यास फलंदाजीत हेन्रिक क्लासन, तर गोलंदाजीत कगिसो रबाडा आणि केशव महाराज यांना चमक दाखवावी लागेल. क्लासन सध्या उत्कृष्ट लयीत असून त्याने गेल्या पाचही एकदिवसीय सामन्यांत अर्धशतक साकारले आहे. त्याला रासी व्हॅन डर डुसेन आणि रायन रिकल्टन यांची साथ लाभणे आवश्यक आहे.

रचिन, विल्यम्सनवर मदार

न्यूझीलंडने चॅम्पियन्स करंडक स्पर्धेची सुरुवात सलग दोन विजयांसह केली होती. मात्र, तिसऱ्या साखळी सामन्यात त्यांना भारताकडून हार पत्करावी लागली. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ ‘अ’ गटात दुसऱ्या स्थानी राहिला. भारताविरुद्ध केन विल्यम्सनने एक बाजू लावून धरताना ८१ धावांची खेळी केली होती. त्याला अन्य फलंदाजांची साथ मिळणे गरजेचे आहे. विशेषत: रचिन रवींद्रमध्ये सुरुवातीपासून आक्रमक शैलीत फलंदाजी करण्याची क्षमता आहे. संघाविरुद्ध शतक साकारले होते. न्यूझीलंडच्या गोलंदाजीची भिस्त कर्णधार मिचेल सँटनर आणि मॅट हेन्री यांच्यावर असेल.

● वेळ : दुपारी २.३० वा. ● ठिकाण : गद्दाफी स्टेडियम, लाहोर● थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस २, स्पोर्टस १८-१, जिओहॉटस्टार अॅप.