सध्या क्रिकेटचे नियम हे फलंदाजांच्या बाजूने अधिक बळकट असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गोलंदाजांना चांगली कामगिरी करण्यासाठी अधिक झगडावे लागते. फलंदाजांवर वर्चस्व मिळवण्यासाठी अनेक गोलंदाज मैदानावर काहीतरी नवीन करताना दिसले आहेत. गतीमध्ये बदल, उलट्या हाताने चेंडू फेकणे, नकल बॉल असे अनेक प्रकार गोलंदाजीमध्ये आपण पाहिले आहे.

वेगवान गोलंदाजांसोबत फिरकी गोलंदाजही अशा प्रकारचे चेंडू टाकताना दिसले आहेत. पण, आता मैदानावर असे काहीतरी घडले जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फार क्वचितच पाहायला मिळाले आहे. न्यूझीलंडची महिला गोलंदाज लेह कास्पार्कने चक्क 38 किलोमीटर प्रति तास वेगाने चेंडू टाकून सर्वांना चकित केले.

 

फलंदाजाला बुचकळ्यात टाकण्यासाठी लेह कास्पार्कने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात कमी गतीचा चेंडू टाकला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या तिसर्‍या वनडे सामन्यात लेह कास्पार्कने ही कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या आठव्या षटकात कास्पार्कने हा चेंडू टाकला.

ऑस्ट्रेलियन फलंदाज बेथ मूनीने कास्पार्कच्या या चेंडूवर सावध फलंदाजी करताना एकेरी धाव घेतली. कास्पार्कने टाकलेला हा चेंडू सोशल मीडियावर चांगलाच व्हायर होत आहे. या सामन्यात लेह कास्परकने 24 धावांत 3 गडी बाद केले.

Story img Loader