न्यूझीलंडचा क्रिकेटपटू जेसी रायडर उत्तेजन सेवन चाचणीत दोषी आढळल्यामुळे त्याच्यावर सहा महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे.
न्यूझीलंडच्या क्रिकेट संघटनेने आज मंगळवार दिलेल्या माहितीनुसार, जेसी रायडरने वजन कमी करण्यासाठी घेतलेल्या औषधांच्या सेवनात तो दोषी आढळला आहे. त्यामुळे त्याच्यावर सहा महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. कायद्याने बंदी असलेल्या औषधांचे रायडरने सेवन केल्याचे स्पष्ट झाले आहे.
आधीच रायडरवर गेल्या काही महिन्यांपूर्वी एका पबबाहेर जोरदार हल्ला झाला होता. त्यामध्ये तो अतिशय गंभीररित्या जखमी झाला होता. नुकताच रायडर यासर्वातून बाहेर पडून पुन्हा क्रिकेट खेळू लागला होता. त्यामुळे संघात पुनरागमन करण्याच्या आशा जागृत झाल्या होत्या परंतु, पुन्हा एकदा रायडर वादाच्या भोवऱयात सापडल्याने त्याला सहा महिने क्रिकेट पासून वंचित रहावे लागणार आहे.