टेस्ट, वनडे तसंच ट्वेन्टी-२० न्यूझीलंड संघासाठी डेव्हॉन कॉनवे हे नाव आधारस्तंभ होऊन गेलंय. फॉरमॅट कोणताही असो- कॉनवे संघात असतो, नुसता असत नाही तर नियमितपणे धावांच्या राशी ओततो. पदार्पणापासून अवघ्या दोन वर्षात संघव्यवस्थापनाचा विश्वास आणि चाहत्यांचं प्रेम कॉनवेने दमदार कामगिरीतून कमावलं आहे. दोन वर्षांची ही वाटचाल स्वप्नवत असली तरी कॉनवेचा न्यूझीलंडचा प्रमुख फलंदाज होण्याचा प्रवास खाचखळग्यांनी भरलेला होता. वर्ल्डकप पदार्पणाच्या निमित्ताने जाणून घेऊया कॉनवेची वाटचाल.

कॉनवेचा जन्म दक्षिण आफ्रिकेतला. तिथल्या डोमेस्टिक क्रिकेटमध्ये कॉनवे जवळपास आठ वर्ष खेळला. पण कामगिरी यथातथाच होती. तो संघात आतबाहेर असे. कधी सलामीवीर म्हणून यायचा, कधी मधल्या फळीतला फलंदाज म्हणून, कधी हाणामारीच्या षटकात यायचा. संघातलं स्थान आणि बॅटिंग पोझिशन नक्की नाही यामुळे कॉनवेच्या कामगिरीत सातत्य नव्हतं. मार्च २०१७ मध्ये कॉनवेने जोहान्सबर्गच्या वाँडरर्स मैदानावर डोमेस्टिक क्रिकेटमधलं पहिलंवहिलं द्विशतक झळकावलं. या खेळीमुळे कॉनवेच्या कारकीर्दीला दिशा मिळेल असं वाटलेलं पण तसं झालं नाही. मी कोणाला दोष देणार नाही, कारण माझ्याच कामगिरीत सातत्य नव्हतं असं कॉनवे सांगतो. तो दोन संघांसाठी खेळला पण कामगिरीत मोठा बदल झाला नाही.

ojas kulkarni of kolhapur participated in first world cup kho kh
ऑस्ट्रेलियन खो-खोची ‘ओजस्वी’ कहाणी! खेळ माहीत नसलेल्या देशाचा भारतीय ‘द्रोणाचार्य’
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
india exports contract 1 percent in december 2024
डिसेंबरमध्ये देशाच्या निर्यातीत घसरण; नेमके कारण काय?
delhi assembly election loksatta news,
मुख्यमंत्री फडणवीस, गडकरी आता दिल्ली विधानसभेच्या मैदानात… ‘हे’ आहेत भाजपचे ४० स्टार प्रचारक
BCCI New Rule Team India Players May Receive Performance based variable pay After Test Defeat
टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरूद्धचा पराभव पडणार भारी; थेट पगारावर परिणाम होणार? BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
NZ vs SL Sri Lanka beat New Zealand by 140 runs Mark Chapman 82 runs in 3rd ODI match at Eden Park
NZ vs SL : तिसऱ्या वनडेत श्रीलंकेने उडवला न्यूझीलंडचा धुव्वा, मार्क चॅपमनची खेळी ठरली व्यर्थ
cm Devendra fadnavis loksatta
महाकालीचे दर्शन शुभसंकेत, ठरवल्यापेक्षा मोठे काम होणार – फडणवीस
वृद्धाश्रमासाठी फक्त एक एकर जागा; उद्याोगमंत्री उदय सामंत यांचे स्पष्टीकरण

आणखी वाचा: Ned vs SA: दोन देशांकडून खेळणारा, कोहलीचा सहकारी आणि ३८ वर्षांचा चिरतरुण शिलेदार

दक्षिण आफ्रिकेतच राहिलो तर क्रिकेटमध्ये भवितव्य फारसं बरं नाही हे कॉनवेला जाणवलं. कोलपॅक नियमाअंतर्गत कॉनवेला इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळता आलं असतं. पार्टनर किमबरोबर गोल्फ खेळता खेळता कॉनवेने हा विषय काढला. ‘दक्षिण आफ्रिकेत माझ्या करिअरचं काही खरं नाही. मला न्यूझीलंडमध्ये जावंसं वाटतंय’, असं कॉनवेने सांगितलं. किमने कॉनवेला सकारात्मक प्रतिसाद दिला. आपल्या हातात वय आहे, आताच धोका पत्करू शकतो. वेगळं काहीतरी करू शकतो या विचारातून कॉनवे दांपत्याने दक्षिण आफ्रिका सोडून न्यूझीलंडमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच का तर हा देश कॉनवेला आवडत असे. याबरोबरीने माल्कन नोफाल आणि मायकेल रिपॉन हे दोन क्रिकेटपटू मित्र न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाले होते. २६व्या वर्षी कॉनवेने स्वत:चा देश सोडला. जोहान्सबर्गमध्ये सुखवस्तू कुटुंबात कॉनवे लहानाचा मोठा झाला. त्यांच्याकडे भरपूर जमीन होती आणि असंख्य प्राणीही. त्याचे वडील फुटबॉल प्रशिक्षक. २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या U19 संघनिवडीवेळी कॉनवेच्या नावाचा विचार झाला होता. या संघात निवड झालेले क्विंटन डी कॉक आणि तेंबा बावूमा पुढे दक्षिण आफ्रिकेचे कर्णधार झाले.

ऑगस्ट २०१७ मध्ये कॉनवे दांपत्य न्यूझीलंडमधल्या वेलिंग्टन शहरात दाखल झालं. व्हिक्टोरिया युनिर्व्हिसिटी क्रिकेट क्लबने कॉनवेला कोच आणि खेळाडू म्हणून ताफ्यात घेतलं. शालेय विद्यार्थ्यांना आठवड्याला २८ तास क्रिकेट शिकवायचं हे कॉनवेचं काम होतं. उर्वरित वेळेत खेळायचं. दक्षिण आफ्रिका ते न्यूझीलंड हे संक्रमण सोपं नव्हतं. कॉनवेने त्याचं राहतं घर विकलं. गाडी विकली. ‘मला जुनं सगळं सोडून देऊन नव्याने सुरू करायचं होतं. मी आईवडिलांशीही बोललो. त्यांना माझं बोलणं पटलं, त्यांनी पाठिंबा दिला. दक्षिण आफ्रिकेत सगळं तसंच ठेऊन आलो असतो तर कदाचित इथे जमलं नाही तर परत जाऊ हे डोक्यात आलं असतं. मला तसं नको होतं’, असं कॉनवेने सांगितलं.

आणखी वाचा: रेफ्युजी कॅम्पमधून सुरुवात, भारतात होम ग्राऊंड, देशात तालिबानी राजवट-अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंची संघर्षमय वाटचाल

मनातली किल्मिषं बाजूला सारुन कॉनवे खेळू लागला. डोमेस्टिक स्पर्धांमध्ये कॉनवेची बॅट तळपू लागली. ब्रूस एडगर आणि ग्लेन पॉकनॉल यांनी कॉनवेचं नैपुण्य हेरलं. वेलिंग्टनच्या टॉम ब्लंडेलची राष्ट्रीय संघात निवड व्हायची त्या त्या वेळी कॉनवे त्याच्या जागी खेळायचा. संधी मिळाली की कॉनवेची बॅट बोलायची. न्यूझीलंडमधल्या खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजीला अनुकूल आहेत. साहजिक वेगवान गोलंदाजांचा सामना करणं हेच कॉनवेचं मुख्य काम. पण याबरोबरीने कॉनवेला चांगल्या फिरकीचाही सामना करता येतो. गरज पडली तर कॉनवे यष्टीरक्षणही करतो. वेलिंग्टनसाठी खोऱ्याने धावा केल्यानंतर २०२० मध्ये तो क्षण आला. कॉनवेने ट्वेन्टी२० प्रकारात पदार्पण केलं. काही महिन्यात वनडे पदार्पणही झालं. पण कॉनवेचं नाव खऱ्या अर्थाने जागतिक पटलावर आलं जेव्हा त्याने इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स इथे कसोटी पदार्पणात द्विशतकी खेळी केली. असंख्य दिग्गज फलंदाजांना प्रदीर्घ कारकीर्दीत लॉर्ड्सवर शतक झळकावता आलेलं नाही. कॉनवेने पदार्पणातच नुसतं शतक नाही तर थेट द्विशतकच झळकावलं. चांगल्या चेंडूंचा सन्मान, एकेरी-दुहेरी धावा घेत धावफलक हलता ठेवणे, वाईट चेंडूवर प्रहार, भागीदारी करण्यात निपुण यामुळे कॉनवेने अल्पावधीत न्यूझीलंडच्या संघातलं स्थान पक्कं केलं. १६ टेस्टमध्ये कॉनवेच्या नावावर ५०च्या सरासरीने १४०३ धावा आहेत. यामध्ये ५ शतकांचा समावेश आहे. वनडेतही कॉनवेची बॅट तळपते आहे. वर्ल्डकप पदार्पणात दिमाखदार दीडशतकी खेळी त्याच्या नावावर आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला लागून कॉनवेला जेमतेम दोन वर्ष झाली आहेत पण तरीही त्याची गणना वरिष्ठ खेळाडूंमध्ये होते.

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात खेळणारा चेन्नई सुपर किंग्स संघाला सर्वसमावेशक सलामीवीराची आवश्यकता होती. चेन्नई संघव्यवस्थापन कामगिरीच्या बरोबरीने खेळाडूच्या वागण्याबोलण्याला, दृष्टिकोनाला महत्त्व देतं. मॅथ्यू हेडन, स्टीफन फ्लेमिंग, माईक हसी असे एकापेक्षा एक मोठे खेळाडू चेन्नईला लाभले होते. चेन्नईने कॉनवेला ताफ्यात समाविष्ट केलं. अवघ्या काही सामन्यानंतरच कॉनवे प्रदीर्घ काळ चेन्नईकडूच खेळतोय असं वाटू लागलं. यंदाच्या हंगामात कॉनवेने ६७२ धावा चोपल्या. यामध्ये ९ अर्धशतकांचा समावेश आहे. चेन्नईला पाचवं जेतेपद मिळवून देण्यात कॉनवेने सिंहाचा वाटा उचलला. अवघ्या दोन हंगामात कॉनवे धोनीचा विश्वासू शिलेदार झाला. आयपीएल हंगामादरम्यान चेन्नई संघव्यवस्थापनाने कॉनवे दांपत्यासाठी एका खास सोहळ्याचं आयोजन केलं होतं. सदरा आणि वेष्टी अशा वेशात कॉनवेला पाहून चाहते खूश झाले. या सोहळ्याला चेन्नईचा अख्खा संघ उपस्थित होता.

‘धोनीसारख्या महान खेळाडू आणि कर्णधाराबरोबर खेळायला मिळणं हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. धोनी त्याचं मोठेपण जाणवू देत नाही. आमच्यात धमाल मस्ती सुरू असते. त्याच्याकडून खूप शिकायला मिळतं. आम्ही खूपदा स्नूकर खेळतो’, असं कॉनवे सांगतो.

न्यूझीलंडचा संघ वर्ल्डकप स्पर्धेत नेहमीच चांगली कामगिरी करतो पण जेतेपदाने त्यांनी हुलकावणी दिली आहे. यंदा त्यांना विश्वविजेतेपद पटकवायचं असेल तर कॉनवेची भूमिका महत्त्वाची आहे. कर्णधार केन विल्यमसन दुखापतीमुळे बराच काळ खेळू शकणार नसल्याने कॉनवेवरची जबाबदारी वाढली आहे.

Story img Loader