आयसीसी २०१९ विश्वचषक पराभवाची सळ अजूनही न्यूझीलंडच्या खेळाडूंना सतावत आहे. यूरो कप स्पर्धेतील अंतिम फेरीत इंग्लंडला इटलीकडून पराभव सहन करावा लागल्यानंतर न्यूझीलंच्या खेळाडूंना टोमणा मारण्यास सुरुवात केली आहे. या स्पर्धेत इटलीने पेनल्टी शूटआउटमध्ये इंग्लंडचा पराभव केला. त्यानंतर न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू स्कॉट स्टायरिस आणि जिमी नीशम यांनी इंग्लंडला टोमणा मारत वर्ल्डकप विजयाचं दु:ख व्यक्त केलं आहे.

“अंतिम फेरीचा निकाल माझ्या समजण्यापलीकडे आहे. इंग्लंडने जास्त कॉर्नर केले होते. अशात तेच चॅम्पियन आहे”, असा टोला स्कॉट स्टायरिसने हाणला आहे. तर न्यूझीलंडच्या जिमी नीशम यानेही इंग्लंडला खडेबोल सुनावले आहे. “पेनल्टी शूटआउट का केलं? सर्वात जास्त पास देणाऱ्या संघाला विजयी घोषित का केलं नाही?”, असा निशाणा जिमी नीशम यांनी साधत ट्वीट केलं आहे. तसंच हॅशटॅग जोकिंग लिहित हसणारी इमोजी टाकली आहे.

२०१९ क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना न्यूझीलंड आणि इंग्लंड दरम्यान खेळला गेला होता. त्यानंतर सुपर ओव्हरमध्येही सामना ड्रॉ झाला होता. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिलच्या नियमानुसार सर्वात जास्त चौकार मारणाऱ्या संघ असलेल्या इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं होतं. आयसीसीच्या या नियमावरून क्रिडाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर हा नियम बदलण्यात आला होता.

Euro Cup 2020: इंग्लंडच्या ल्यूक शॉचा जबरदस्त गोल!; जलद गोल करणाऱ्या खेळाडूंच्या पंगतीत स्थान

योगायोगाने यूरो कप आणि २०१९ विश्वचषक दोन्हीही अंतिम सामने लंडनमध्ये खेळले गेले. लंडनच्या वेम्बली स्टेडियमवर रंगलेल्या अटीतटीच्या महामुकाबल्यात इटलीने इंग्लंडवर सरशी साधत यूरो कप २०२०च्या विजेतेपदाचा मान पटकावला. होम का रोम, या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात असलेल्या चाहत्यांना वेम्बलीवर पेनल्टी शूटआउटचा थरार पाहायला मिळाला. स्पर्धेतील सर्वात जलद गोल करत दणदणीत सुरुवात करणाऱ्या इंग्लंडचा या सामन्यातील शेवट मात्र कडू ठरला. पहिल्या सत्रात इंग्लंडने एक तर दुसऱ्या सत्रात इटलीने गोल करत बरोबरी साधली होती. ३० मिनिटांच्या अतिरिक्त वेळेतही सामन्याचा निकाल समोर आला नव्हता. पेनल्टी शू़टआउटमध्ये जेडन सँचो, साका आणि रॅशफोर्ड हे खेळाडू इंग्लंडसाठी गोल करण्यात अपयशी ठरले. तब्बल ५५ वर्षांचा दुष्काळ संपवण्याचे इंग्लंडचे स्वप्न हे धूळीस मिळाले आहे.

Story img Loader