नेयमारच्या दोन गोलांच्या बळावर ब्राझीलने आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामन्यात तुर्कस्तानवर ४-० असा दणदणीत विजय मिळवला. फर्नाडिनोच्या क्रॉसवर नेयमारने १९व्या मिनिटाला ब्राझीलचे खाते खोलले. पाच मिनिटांनंतर सुआट कायाच्या स्वयंगोलमुळे ब्राझीलची आघाडी २-० अशी वाढली. विलियनने तिसरा गोल झळकावल्यानंतर नेयमारने स्वत:चा दुसरा आणि संघासाठी चौथा गोल करत ब्राझीलला विजय मिळवून दिला.
ब्राझीलच्या विजयात नेयमार चमकला
नेयमारच्या दोन गोलांच्या बळावर ब्राझीलने आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामन्यात तुर्कस्तानवर ४-० असा दणदणीत विजय मिळवला.
First published on: 14-11-2014 at 02:58 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neymar 22 has scored 42 goals for brazil