ब्राझीलमधील आघाडीचा फुटबॉलपटू नेयमार जूनमध्ये अमेरिकेत होणाऱ्या कोपा अमेरिका स्पध्रेला मुकणार आहे. मात्र ऑगस्ट महिन्यात रिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पध्रेत तो देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे, असे बार्सिलोनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
‘‘नेयमार फक्त ब्राझीलमध्ये ३ ते २१ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करेल,’’ असे क्लबने म्हटले आहे.
नेयमार हा कोपा अमेरिका आणि ऑलिम्पिक या दोन्ही स्पर्धासाठी उपलब्ध असेल, अशी आशा प्रशिक्षक डुंगा यांनी प्रकट केली आहे. मात्र पुढील हंगामाच्या पाश्र्वभूमीवर नेयमारला पुरेशा विश्रांतीची आवश्यकता आहे, असे बार्सिलोनाने म्हटले आहे.
ऑलिम्पिक ही एकमेव आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे, जी ब्राझीलला अद्याप जिंकता आलेली नाही. चार वर्षांपूर्वी लंडनमध्ये मेक्सिकोकडून पराभूत झाल्यामुळे ब्राझीलचे सुवर्णपदक हुकले होते. त्यावेळी नेयमारसुद्धा त्यांच्या संघात होता.
सहा सामन्यांमध्ये प्रथमच नेयमारने चांगली कामगिरी केल्यामुळे तीन पराभवांनंतर बार्सिलोनाने कोरूनाचा ८-० असा धुव्वा उडवला.

Story img Loader