फिफा विश्वचषकातील दुखापतीनंतर सावरलेल्या नेयमारने शनिवारी ला लीगा फुटबॉल स्पर्धेत शानदार पुनरागमन केले. लिओनेल मेस्सीच्या सहकार्याने नेयमारने सहा मिनिटांत दोन गोल झळकावत बार्सिलोनाला अ‍ॅटलेटिको बिलबाओवर २-० असा विजय मिळवून दिला. सलग तिसऱ्या विजयामुळे बार्सिलोनाने गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखले आहे. ६३व्या मिनिटाला मैदानावर उतरणाऱ्या नेयमारने ७९व्या मिनिटाला बार्सिलोनाचे खाते खोलले. त्यानंतर पाच मिनिटांनी दुसरा गोल नोंदवला.

Story img Loader