Neymar back in action after injury : ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमारने दुखापतीमुळे एका वर्षानंतर सोमवारी स्पर्धात्मक फुटबॉलमध्ये यशस्वी पुनरागमन केले. त्याने एएफसी चॅम्पियन्स लीग एलिटच्या गट टप्प्यात अल हिलालला संयुक्त अरब अमिरातीच्या अल ऐनचा ५-४ असा पराभव करण्यात मदत केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमारने ऑगस्ट २०२३ मध्ये सौदी अरेबियाच्या अल हिलाल क्लबशी करार केला होता, परंतु गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दुखापत होण्यापूर्वी तो त्याच्या नवीन क्लबसाठी फक्त पाच सामने खेळू शकला होता. नेमारने चार वेळा आशियाई चॅम्पियन अल हिलालसाठी ३६९ दिवसांनंतर आपला पहिला सामना खेळला. सामना संपायला फक्त १३ मिनिटे बाकी असताना नेमार मैदानात उतरला. त्याने मैदानात येताच धारदार शॉट मारला पण तो गोल पोस्टला लागला.

नेमारचे दुखापतीनंतर पुनरागमन –

अल हिलालचा या स्पर्धेतील हा सलग तिसरा विजय आहे. नेमार, १२८ सामन्यांमध्ये ७९ गोलासह त्याच्या देशाचा सर्वकालीन आघाडीचा गोल करणारा खेळाडू आहे. दुखापतीनंतर प्रथमच खेळायला आलेला नेमार पहिल्यांदा बेंचवर होता. पण सामन्याच्या ७६ व्या मिनिटाला मैदानात उतरला. तोपर्यंत, सध्याच्या सौदी प्रो लीगचे नेतृत्व करणारा विक्रमी चार वेळचा आशियाई चॅम्पियन, रेनन लोदी आणि सर्गेज मिलिन्कोविक-सॅविक यांच्या गोलमुळे आणि सालेम अल डावसरीच्या हॅट्ट्रिकमुळे ५-३ ने आघाडीवर होता.

हेही वाचा – Ayush Badoni : खेळाडू आहे की सुपरमॅन! आयुष बदोनीने घेतलेला चित्तथरारक झेल पाहून सर्वच अवाक्, पाहा VIDEO

विश्वचषक खेळण्याची इच्छा व्यक्त केली –

नेमारची मार्केटिंग कंपनी एनआर स्पोर्ट्सने शनिवारी एका निवेदनात म्हटले होते की, ब्राझीलच्या स्टार खेळाडूचे फुटबॉलवरील प्रेम आणि पुढील विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची तीव्र इच्छा यामुळे त्याला पुनरागमन करण्याची प्रेरणा मिळाली. संयुक्त अरब अमिरातीच्या अल ऐन विरुद्ध अल हिलालच्या सामन्याच्या संदर्भात निवेदनात म्हटले होते की, ‘त्याच्या पुनरागमनाबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नसला तरी तो सोमवारी होणाऱ्या सामन्यासाठी उपलब्ध असेल.’ त्यानुसार तब्बल एक वर्षानंतर पहिला सामना खेळला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neymar makes comeback for al hilal after year long recovery from acl injury in afc champions league vbm