फुटबॉल विश्वचषकातील सलामीच्या सामन्याला अनन्यसाधारण महत्त्व असते. पहिला सामना जिंकणाऱ्या संघाची बाद फेरी जवळपास निश्चित, असा आजवरचा इतिहास सांगतो. घरच्या मैदानावर घरच्या चाहत्यांसमोर खेळताना पाच वेळा विश्वचषक विजेत्या ब्राझीलने ही संधी दवडली असती, तर नवलच वाटले असते. पण ब्राझिलियन फुटबॉलमधील ‘गोल्डन बॉय’ समजल्या जाणाऱ्या नेयमारने दोन गोलांची बरसात करत ब्राझीलला क्रोएशियावर ३-१ असा विजय मिळवून दिला.
मार्सेलोने अनवधानाने केलेल्या स्वयंगोलमुळे क्रोएशियाने ११व्या मिनिटालाच १-० अशी आघाडी घेतली होती. ब्राझीलचा हा विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील पहिला स्वयंगोल ठरला. पण तमाम देशवासीयांचा आधारस्तंभ असलेल्या नेयमारची जादू काही क्षणांतच पाहायला मिळाली. २९व्या मिनिटाला बरोबरी साधणारा गोल केल्यानंतर ७१व्या मिनिटाला त्याने पेनल्टीवर गोल लगावला. सामना संपायला काही सेकंद शिल्लक असताना ऑस्करने तिसरा गोल लगावून ब्राझीलच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
क्रोएशियाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करून ब्राझीलचा गोलरक्षक ज्युलियो सेसारवर दडपण आणले होते. सातव्या मिनिटालाच इव्हिका ऑलिचने मारलेला फटका सेसारने अडवला होता. पण ११व्या मिनिटाला त्याचेच फळ क्रोएशियाला मिळाले. डाव्या कॉर्नरवरून मारलेला फटका गोलजाळ्यासमोरून जात असताना पुढून धावत येणाऱ्या मार्सेलोचा पाय चेंडूला लागला. गोलरक्षक सेसार दुसऱ्या बाजूला असल्यामुळे चेंडू थेट गोलजाळ्यात विसावला. मार्सेलोच्या या स्वयंगोलने मात्र क्रोएशियाच्या आक्रमणाला धार मिळाली. २७व्या
दुसऱ्या सत्रात क्रोएशियाने आक्रमणापेक्षा बचावावरच भर दिला, तरीही त्यांच्याकडून बचावात चुका होत गेल्या. ६९व्या मिनिटाला देजान लोवरेनने फ्रेडला गोलक्षेत्रात पाडल्याप्रकरणी जपानचे पंच युईची निशिमुरा यांनी ब्राझीलला पेनल्टी बहाल केली. त्याचा पुरेपूर फायदा उठवत नेयमारने दुसरा गोल झळकावला. नेयमारने धावताना आढेवेढे घेत मारलेला फटका क्रोएशियाचा गोलरक्षक प्लेटिकोसाच्या हाताला लागून गोलजाळ्यात गेला. २-१ अशा आघाडीच्या बळावर ब्राझील विजयी सलामी नोंदवणार, असे वाटत असतानाच ऑस्करने अखेरच्या क्षणी एका गोलची भर घातली. क्रोएशियाचे सर्व बचावपटू ब्राझीलच्या गोलक्षेत्रात असताना ऑस्करने चेंडूवर ताबा मिळवून समोर असलेल्या प्लाकिटिकला सहज चकवून हा गोल साकारला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा