बार्सिलोनाचा खेळाडू नेयमारच्या बदलीबाबत झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी साक्ष देण्याकरिता त्याला २ फेब्रुवारीला राष्ट्रीय न्यायालयात साक्ष देण्यासाठी बोलाविण्यात आले आहे.
नेयमारबरोबरच बार्सिलोना क्लबचे अध्यक्ष जोसेफ मारिया बातरेमेयू व माजी अध्यक्ष सांद्रो रोसेल तसेच नेयमारच्या सान्तोस क्लबच्या दोन संचालकांनाही साक्ष देण्यासाठी आदेश देण्यात आला आहे. सान्तोस क्लबचे पदाधिकारी १ फेब्रुवारी रोजी साक्ष देणार आहेत. ९ फेब्रुवारी रोजी बार्सिलोनाचे पदाधिकारी साक्ष देतील.
बार्सिलोनाच्या डीआयएस कंपनीने या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. नेयमारचे ४० टक्के हक्क आपल्याकडे असून सान्तोस क्लबकडून बार्सिलोना क्लबकडे नेयमारची बदली करताना आपली फसवणूक झाली असल्याचे त्यांनी अर्जात म्हटले आहे.

Story img Loader