Nicholas Pooran broke Mohammad Rizwan world record : आयपीएल २०२५ साठी लवकरच काही मोठ्या घोषणा केल्या जाणार आहेत, त्यानंतर लिलाव प्रक्रिया सुरू केली जाईल. दरम्यान, आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळणाऱ्या खेळाडूने अप्रतिम कामगिरी केली आहे. या खेळाडूने एक मोठा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. हा खेळाडू दुसरा कोणी नसून वेस्ट इंडिजचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पूरन आहे. निकोलस पुरनने पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानला मागे टाकते विश्वविक्रम केला आहे. त्याच्या हा विश्वविक्रम नक्की काय आहे? जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निकोलसने मोहम्मद रिझवानचा विश्वविक्रम मोडला –

वेस्ट इंडिजमध्ये कॅरेबियन प्रीमियर लीगचे आयोजन केले जात आहे. जिथे निकोलस पूरन रोज काही ना काही विश्वविक्रम आपल्या नावावर करत आहेत. अलीकडेच त्याने टी-२० क्रिकेटच्या एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. यावेळी त्याने टी-२० क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम करून मोहम्मद रिझवानला मागे टाकले आहे.

मोहम्मद रिझवानने २०२१ मध्ये टी-२० क्रिकेटमध्ये २०३६ धावा केल्या होत्या, परंतु कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये त्रिनबागो नाइट रायडर्स आणि बार्बाडोस रॉयल्स यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यात निकोलस पूरनला हा विक्रम मोडण्यासाठी फक्त ५ धावांची गरज होती. या सामन्यात त्याने २७ धावांची खेळी खेळली. यासह हा विक्रम आता पुरणच्या नावावर झाला आहे. या सामन्यानंतर त्याने यावर्षी टी-२० क्रिकेटमध्ये २०५९ धावा केल्या आहेत.

हेही वाचा – इराणी कप हे नाव स्पर्धेला कसं मिळालं? जाणून घ्या भारतीय क्रिकेटच्या प्रतिष्ठित देशांतर्गत स्पर्धेचा संपूर्ण इतिहास

एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –

  • निकोलस पूरन – २०५९ धावा (२०२४)
  • मोहम्मद रिझवान – २०३२ धावा (वर्ष २०२१)
  • ॲलेक्स हेल्स – १९४६ धावा (२०२२)
  • जोस बटलर – १८३३ धावा (२०२३)
  • मोहम्मद रिझवान – १८१७ धावा (२०२२)

हेही वाचा – MS Dhoni : अमेरिकेतून परतल्यानंतर धोनीने बाईकवरुन फार्महाऊसमध्ये मारला फेरफटका, VIDEO व्हायरल

२०२४ मध्ये सर्वाधिक टी-२० धावा करणारे टॉप ५ फलंदाज –

  • निकोलस पूरन – २०५९ धावा
  • रीझा हेंड्रिक्स – १५५५ धावा
  • बाबर आझम – १४८० धावा
  • ट्रॅव्हिस हेड – १४४२ धावा
  • जेम्स विन्स – १४१४ धावा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nicholas pooran breaks mohammad rizwan record and creates world record for most t20 runs in a calendar year in cpl 2024 vbm