Big names decline West Indies Central Contract offer : वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड यूएसएसह संयुक्त यजमान म्हणून २०२४ टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करणार आहे. त्याचबरोबर विश्वचषकाच्या काही महिन्यांपूर्वी संघाला मोठा धक्का बसू शकतो. वास्तविक, संघातील तीन दिग्गज खेळाडूंनी केंद्रीय करार नाकारला आहे. केंद्रीय खेळाडूंचा क्रिकेट बोर्डाशी करार केला जातो. याअंतर्गत खेळाडूंना वार्षिक वेतन मिळते. यावरून असे दिसून येते की तुम्ही राष्ट्रीय संघाशी संबंधित आहात आणि प्रत्येक स्पर्धेसाठी करार असलेल्या खेळाडूंनाच निवडीत महत्त्व मिळते. पण आता या तीन दिग्गज खेळाडूंनी टी-२० विश्वचषकापूर्वी करार नाकारून कॅरेबियन चाहत्यांना धक्का दिला आहे.
कोण आहेत ते तीन दिग्गज खेळाडू?
दोन वेळा टी-२० विश्वचषक जिंकणारा वेस्ट इंडिजचा संघ गेल्या काही वर्षांत विस्कळीत झाला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे बोर्डाशी असलेले मतभेद आणि खेळाडूंचा टी-२० लीगकडे वाढता कल. त्यांना राष्ट्रीय संघातून खेळायचे नाही. कदाचित त्यामुळेच आता निकोलस पूरन, जेसन होल्डर आणि काइल मायर्स सारख्या बड्या खेळाडूंनी संघाचा केंद्रीय करार नाकारला आहे. होल्डर आणि पूरण हे देखील संघाचे माजी कर्णधार आहेत. पण आता हे खेळाडूही काही माजी खेळाडू किरॉन पोलार्ड, ड्वेन ब्राव्हो आणि सुनील नरेन यांच्या मार्गावर चालताना दिसत आहेत.
टी-२० विश्वचषकात वेस्ट इंडिजकडून खेळणार का?
मात्र, हे खेळाडू संघ निवडीसाठी उपस्थित राहणार असल्याचे आयसीसीकडून सांगण्यात आले आहे. या तिघांनीही संघासोबत आगामी सामन्यांमध्ये खेळण्यासाठी उपस्थितीबाबत स्पष्टता व्यक्त केली आहे. पण तिघांनीही करार नाकारल्याने ते टी-२० लीगवर अधिक लक्ष केंद्रित करणार असल्याचे स्पष्ट होते. पण तिघांनीही त्यांच्या उपलब्धतेवर दिलेल्या उत्तरामुळे चाहत्यांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. कदाचित ते २०२४ च्या टी२० विश्वचषकात सहभागी होऊ शकतील. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय बोर्ड घेईल, कारण करार असलेल्या खेळाडूंचा प्रथम विचार केला जातो.
पण करार नाकारूनही कोणीही हा विश्वचषक खेळू शकतो, याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे ट्रेंट बोल्ट. टी-२० लीग आणि फ्रँचायझी क्रिकेटमुळे बोल्टने न्यूझीलंडचा करारही नाकारला होता. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो संघासोबत खेळताना दिसला होता. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकातही तो संघाचा भाग होता. अशा परिस्थितीत पूरण, होल्डर आणि मायर्स यांचेही मरून आर्मीमध्ये पुनरागमन होण्याची शक्यता कायम आहे. पण त्याचा संपूर्ण निर्णय क्रिकेट वेस्ट इंडिजवर अवलंबून असेल.
हेही वाचा – IND vs SA 1st T20 : भारत-दक्षिण आफ्रिकेतील पहिला सामना रद्द, ‘या’ तारखेला होणार दुसरी लढत
वेस्ट इंडिज संघाशी करार असलेले खेळाडू –
अॅलेक अथेनेस, क्रेग ब्रॅथवेट, केसी कार्टी, टेगनरैन चंद्रपॉल, जोशुआ डी सिल्वा, शाई होप, अकेल होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रेंडन किंग्स, गुडाकेश मोती, रोव्हमन पॉवेल, केमार रोच, जेडेन सील्स, रोमॅरियो शेफर्ड.