Tom Curran run out controversy video in ILT20 : अबू धाबी येथे खेळल्या जात असलेल्या आयएलटी-२० लीग २०२५ मध्ये, गल्फ जायंट्सने २५ जानेवारी रोजी एका रोमांचक सामन्यात गतविजेत्या एमआय एमिरेट्सचा २ विकेट्सनी पराभव केला. मात्र, या सामन्यात शेवटच्या षटकांमध्येही बरेच नाट्य पाहायला मिळाले. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना एमआय एमिरेट्सने २० षटकांत ६ गडी गमावून १५१ धावा केल्या. एमआयकडून टॉम बँटनने सर्वाधिक ५६ धावा केल्या. प्रत्युत्तरात गल्फ जायंट्सने शेवटच्या चेंडूवर २ गडी शिल्लक असताना १५२ धावांचे लक्ष्य गाठले. या सामन्यात शेवटच्या षटकांमध्येही बरेच नाट्य पाहायला मिळाले. गल्फ जायंट्सला १३ चेंडूत विजयासाठी १८ धावांची गरज असताना ही घटना घडली. त्यावेळी टॉम करन आणि मार्क एडेअर फलंदाजी करत होते.
टॉम करनच्या रनआऊटवरुन पेटला वाद –
१८ व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर मार्क एडेअरने लाँगऑफच्या एका धावेसाठी शॉट खेळला. यावर दोन्ही फलंदाजांनी सहज एकेरी धाव पूर्ण केली. पण टॉम कुरनने षटक संपल्याचे समजत क्रीज सोडली. मात्र, चेंडू तोपर्यंत चेंडू डेथ झाला नव्हता. यादरम्यान लाँग ऑफवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या किरॉन पोलार्डने चेंडू उचलून कीपरच्या दिशेने फेकला. चेंडू कीपर पुरणपर्यंत पोहोचण्यापूर्वीच करणने क्रीज सोडली होती. करन क्रीजच्या बाहेर गेल्यानंतर पूरनने चेंडू हातात येताच बेल्स उडवल्या आणि रनआऊटची अपील केले. यानंतर, रिप्ले पाहण्यात आला ज्यामध्ये स्पष्टपणे दिसत होते की कुरनने धाव पूर्ण केल्यानंतर क्रीज सोडला आणि त्यानंतर तिसऱ्या पंचाने त्याला आऊट घोषित केले. यानंतर वादाला सुरुवात झाली.
रनआऊटनंतर नक्की काय घडलं?
रनआऊट झाल्यानंतर टॉम करन पॅव्हेलियनच्या दिशेने जाऊ लागला, तेव्हा सीमारेषेबाहेर उभे असलेले गल्फ जायंट्सचे प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी आपला निषेध व्यक्त केला. यानंतर त्यांनी करणला मैदानावर थांबण्याचे संकेत दिले. हे पाहून एमआयच्या खेळाडूंना निराश झाले. पण वेळ वाया जात असल्याचे पाहून त्यांनी एमआय एमिरेट्सने फलंदाजाला परत बोलावण्याचा निर्णय घेतला. या घटनेनंतर मार्क एडेअर पुढच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर शेवटच्या षटकात टॉम करनही पायचीत झाला. असे असतानाही गल्फ जायंट्सने २ गडी राखून विजय मिळवला.