प्रतिष्ठेच्या अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर करण्यात आला असून, वेगवान गोलंदाज ग्रॅहम ओनियन्सला १३ सदस्यीय संघात स्थान देण्यात आले आहे. सराव सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झाल्याने स्टुअर्ट ब्रॉड आणि ग्रॅमी स्वॉन यांच्या सहभागाविषयी साशंकता व्यक्त करण्यात येत होती. मात्र दोघेही तंदुरुस्त असल्याने त्यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका गुडघ्याच्या दुखापतीमुळे खेळू न शकलेल्या केव्हिन पीटरसनचे संघात पुनरागमन झाले आहे. दरम्यान, सलामीवीर निक कॉम्पटनला संघातून डच्चू देण्यात आला असून, त्याच्या जागी जो रुटला संधी देण्यात आली आहे. संघ : अ‍ॅलिस्टर कुक (कर्णधार), जो रुट, केव्हिन पीटरसन, इयान बेल, जोनाथन ट्रॉट, जॉनी बेअरस्टो, मॅट प्रॉयर, ग्रॅमी स्वॉन, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन, टीम ब्रेसनन, स्टीव्हन फिन, ग्रॅहम ओनियन्स.

Story img Loader