मालवणातील चिवला येथे नुकत्याच झालेल्या चौथ्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेला स्पर्धकांचा भरघोस प्रतिसाद लाभला होता. पण स्पध्रेचे आर्थिक गणित सांभाळताना आयोजकांना तारेवरची कसरत करावी लागली होती. या स्पर्धेवेळी स्थानिक खासदार नीलेश राणे यांच्याकडून आयोजकांना ठोस असे कोणतेच आश्वासन मिळाले नव्हते. पण याबाबतचे वृत्त २६ डिसेंबरला ‘लोकसत्ता’च्या क्रीडा पानावर छापून आल्यावर तातडीने नीलेश राणे यांनी आयोजकांशी संपर्क साधला आणि त्यांना दोन लाख रुपयांची आर्थिक मदत केली. गुरुवारी आयोजकांनी त्यांची भेट घेतल्यावर पुढील स्पर्धा घेण्याचे ठोस आश्वासनही त्यांनी दिले.
‘‘आम्ही गेले तीन वर्षे ही स्पर्धा घेत आहोत. पण आतापर्यंत आम्हाला ही स्पर्धा घेण्यासाठी निधी मिळत नव्हता. पण ‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर नीलेश राणे यांनी दोन लाख रुपयांची मदत केली. त्याचबरोबर यापुढील स्पर्धेची जबाबदारी उचलण्याची जबाबदारी त्यांनी घेतली. तसेच सिंधुदुर्गमध्ये जलतरणाला प्रोत्साहन मिळण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी आम्हाला दिले,’’ असे सिंधुदुर्ग जलतरण संघटनेचे सचिव राजेंद्र पालकर यांनी सांगितले. 

Story img Loader