पुढील आठवडय़ात होणाऱ्या हॉकी प्रीमिअर लीगसाठी पाकिस्तानच्या हॉकीपटूंना भारतीय उच्च आयुक्तालयाने व्हिसा मंजूर केला आहे. ‘हॉकी इंडिया लीगसाठी आम्ही पाकिस्तानच्या नऊ हॉकीपटूंना व्हिसा मंजूर केला आहे’, असे भारतीय उच्च आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
गुरुवारी आम्ही भारताकडे नऊ पाकिस्तानी हॉकीपटूंच्या व्हिसाची मागणी केली होती. शुक्रवारी त्यांनी ही मागणी मान्य केली असून येत्या शनिवारी हे हॉकीपटू भारतासाठी रवाना होतील, अशी माहिती पाकिस्तानच्या उच्च आयुक्तालयाने दिली आहे.
या नऊ खेळाडूंमध्ये मोहम्मद रिझवान (कनिष्ठ), मोहम्मद रिझवान (वरिष्ठ), सईद काशिफ शाह, शफकत रसूल, मोहम्मद इरफान, मोहम्मद तौसिक, मोहम्मद रशिद, फईद अहमद आणि इम्रान भट्ट यांचा समावेश आहे.
नऊ पाकिस्तानी हॉकीपटूंना व्हिसा मंजूर
पुढील आठवडय़ात होणाऱ्या हॉकी प्रीमिअर लीगसाठी पाकिस्तानच्या हॉकीपटूंना भारतीय उच्च आयुक्तालयाने व्हिसा मंजूर केला आहे. ‘हॉकी इंडिया लीगसाठी आम्ही पाकिस्तानच्या नऊ हॉकीपटूंना व्हिसा मंजूर केला आहे’, असे भारतीय उच्च आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
First published on: 12-01-2013 at 01:40 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nine pak players get indian visas for hockey league