Paris Paralympics 2024 Nishad Kumar Silver Medal: पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये भारताचे पॅरा अ‍ॅथलिट एकामागून एक पदकांची कमाई करत आहेत. ज्यामध्ये पुरुषांच्या T47 उंच उडी स्पर्धेत भारताच्या निशाद कुमारने रौप्य पदक जिंकले. निषाद कुमारने अंतिम फेरीत २.०४ मीटर लांब उडी मारून दुसरे स्थान पटकावले. याशिवाय भारताचा राम पाल हा अ‍ॅथलिट देखील याच स्पर्धेत सहभागी झाला होता, परंतु तो १.९५ मीटर उंच उडी मारण्यात यशस्वी ठरला त्यामुळे तो ७व्या क्रमांकावर राहिला. अमेरिकेच्या रॉड्रिक टाऊनसेंड-रॉबर्ट्सने या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे, ज्याचा दबदबा या स्पर्धेत यापूर्वीही दिसून आला आहे.

T47 श्रेणीतील उंच उडीपटू निषाद कुमारने रविवारी, १ सप्टेंबरला रात्री उशिरा २.०४ मीटरच्या स्पर्धेतील सर्वोत्तम प्रयत्नासह पॅरालिम्पिक गेम्समध्ये सलग दुसरे रौप्य पदक जिंकले. निषाद कुमार पॅरा-ॲथलेटिक्समध्ये सलग दोन पदके जिंकणारा सर्वात तरुण भारतीय ठरला. निषाद कुमारने टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेतही रौप्य पदक जिंकले होते. त्याने टोकियोमध्ये २.०६ मीटर उडी मारली होती. T47 हे अशा स्पर्धकांसाठी आहे ज्यांच्या कोपर किंवा मनगटाचा खालील भाग नाही किंवा इजा झाली आहे.

D Gukesh How Much Prize Money Did Indian Grandmaster Win After Winning World Chess Championship
D Gukesh Prize Money: करोडपती झाला विश्विविजेता गुकेश, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानंतर किती मिळाली बक्षिसाची रक्कम?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Smriti Mandhana Becomes the First Cricketer to Hit 4 Hundreds in Womens odis in a Calendar Year World Record
Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या नावे विश्वविक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला फलंदाज
Syed Mushtaq Ali Trophy
SMAT 2024: मुंबई सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत! रहाणे-शॉच्या फलंदाजीसमोर विदर्भचा संघ पडला फिका
Maval MLA Sunil Shelke , Sunil Shelke, Paragliders,
मावळला मंत्रिपद मिळण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना आकाशातून गवसणी, ११ पॅराग्लायडर्सनी ७०० फूट उंचीवरून …
bjp sujay patki
पहिली बाजू : आता महाराष्ट्र थांबणार नाही!
Loksatta Lokankika Five ekankika  in Mumbai zonal finals Mumbai news
मुंबई विभागीय अंतिम फेरीत पाच एकांकिकांची धडक
Rohit Sharma on Mohammed Shami Fitness and Comeback in Team for last 3 Test Against Australia
IND vs AUS: मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबद्दल रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, दुसऱ्या कसोटी पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?

हेही वाचा – Paris Paralympics 2024: पॅरा ॲथलीट प्रीति पालने १०० मी शर्यतीत घडवला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारी ठरली पहिला भारतीय खेळाडू

निषाद कुमारने रौप्यपदक जिंकत घडवला इतिहास

निषादचे रौप्य पदक हे पॅरा-ॲथलेटिक्समधील भारताचे तिसरे पदक आणि पॅरिस पॅरालिम्पिकमधील देशाचे एकूण सातवे पदक होते. यापूर्वी, प्रीती पालने इतिहास घडवला जेव्हा तिने पॅरालिम्पिकमध्ये ट्रॅक इव्हेंटमध्ये दुसरे पदक पटकावले. तिने २०० मीटर T35 प्रकारात ३०.०१ सेकंदाच्या वैयक्तिक सर्वोत्तम वेळेसह कांस्यपदक जिंकले.

हिमाचल प्रदेशातील अम्बजवळील बदाऊन गावात वाढलेल्या निषाद कुमारचे स्वप्न भारतीय सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करण्याचे होते. निषाद शेतकरी वडील रशपाल सिंग यांना शेतीत मदत करायचे, पण २००७ मध्ये चारा कापण्याच्या यंत्रात त्यांचा हात कापला गेला. रशपाल सिंग यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, ‘गावातील इतर मुलांप्रमाणे निषादलाही शाळेत जाताना लष्करी जवानांना भेटणे आवडते. भारतीय सैन्यात भरती होण्याचे त्याचे पहिले स्वप्न होते. जेव्हा अपघात झाला तेव्हा त्याला वेदनांची काळजी नव्हती, उलट तो डॉक्टरांना विचारत होता की तो सैन्यात भरती होऊ शकतो का. डॉक्टरांनाही त्याला निराश करायचे नव्हते. पॅरालिम्पिकमधील त्याची दोन पदकं देशाची सेवा करण्याच्या त्याच्या दृढ संकल्पाचा पुरावा आहेत.

हेही वाचा – Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणे टीम इंडियात पुनरागमन करण्यास सज्ज! काउंटी चॅम्पियनशिपमध्ये शतक झळकावत दिले संकेत

२००७ मध्ये हाताचा अपघात

गाव जवळजवळ जंगलात आणि राज्य महामार्गाजवळ होते. त्याच्या गावातील बहुतेक लोक मका आणि गहू पिकवतात. निषाद कुमार आपल्या वडिलांना गवंडी काम करताना पाहत असे. ऑगस्ट २००७च्या त्याच्या जीवनातील दुर्दैवी दिवशी, निषाद कुमार त्याच्या आईला मदत करत असताना त्याचा उजवा हात मशीनमध्ये अडकला आणि अक्षरश त्या हाताचे तुकडे झाले. पण उंचीने जास्त असलेला निषाद अवघ्या तीन महिन्यांतच पुन्हा शाळेत जाऊ लागला. कटोहर खुर्द जवळील गावातील सरस्वती विद्या मंदिर शाळेत तो शिकत होता, जिथे प्रशिक्षक रमेश यांनी २००९ मध्ये निषाद कुमारला अॅथलेटिक्सची ओळख करून दिली.

निषाद कुमारचे आई-वडिला व बहिण (एक्सप्रेस फोटो)

निषाद २०० आणि १०० मीटर स्पर्धेत सहभागी व्हायचा

मोठी बहीण रमा कुमारी सांगतात, ‘उंच उडी व्यतिरिक्त, त्याला १०० मीटर आणि २०० मीटर शर्यतींमध्ये भाग घेणे आवडते. शाळेतील प्रशिक्षणानंतर तो रात्री उशिरा सायकलवरून घरी यायचा. शालेय स्पर्धांदरम्यान, तो नेहमी प्रशिक्षकांना सांगत असे की तो सक्षम असलेल्या मुलांशी स्पर्धा करेल कारण तो स्वत:ला त्यांच्या बरोबरीचा असल्याचे समजत असे.

हेही वाचा – Women’s Wrestling History: या करू शकतात, तर तुम्ही का नाही? महिला कुस्तीपटूंची संघर्षगाथा नेमकं काय सांगते?

नीरज चोप्राला प्रशिक्षण दिलेले निषादचे प्रशिक्षक

निषाद कुमारने पटियाला येथील सब-ज्युनियर स्कूल नॅशनल गेम्समध्ये उंच उडीत रौप्य पदक जिंकून प्रथमच राष्ट्रीय कामगिरीची चव चाखली. २०१७ मध्ये, त्याने प्रशिक्षक नसीम अहमद यांच्या हाताखाली प्रशिक्षण घेण्यासाठी पंचकुला येथे पोहोचला. नसीम अहमद यांनी एकेकाळी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते नीरज चोप्रा आणि विक्रम चौधरी यांना प्रशिक्षण दिले होते.

निषादची सर्वात मोठी ताकद म्हणजे तो लहानपणापासूनच सर्वसाधारण गटात स्पर्धा करू शकतो यावर त्याचा विश्वास होता. यामुळे त्याला आत्मविश्वासपूर्ण ॲथलीट बनण्यास मदत झाली. प्रशिक्षक चौधरी सांगतात, ‘फॉसबरी फ्लॉप तंत्रात त्याला पारंगत बनवणे हे आमचे मुख्य आव्हान होते, जिथे जंपर पोटावर पडतो. तो सिझर किक स्टाईलमध्ये उडी मारायला शिकला, ज्यामुळे त्याला लहान वयातच त्याची मूळ ताकद आणि गुडघ्याच्या पोझिशनसाठी मदत झाली.’

Story img Loader