कोनियाला कनिष्ठ राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पध्रेचे जेतेपद
तेलंगणातील खम्मम येथे पार पडलेल्या कनिष्ठ राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचेच वर्चस्व पाहायला मिळाले. कनिष्ठ गटात एका सुवर्णासह चार पदके पटकावली. महाराष्ट्राने ८३ गुणांसह सांघिक जेतेपदाला गवसणी घातली. मास्टर्स आणि अपंगांच्या गटांमध्येही महाराष्ट्रानेच बाजी मारली. मात्र स्पध्रेचा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स ठरला अरुणाचल प्रदेशचा निशू कोनिया. मास्टर्स गटात ५० ते ६० वष्रे वयोगटात महाराष्ट्राचे सुरेश नायर विजेते ठरले .
स्पध्रेचा निकाल पुढीलप्रमाणे-
कनिष्ठ गट – ५५ किलो वजनी गट : १. अंकुर (दिल्ली), २. फिरोज खान (तेलंगणा), ३. लालजी मोरया (महाराष्ट्र) ६० किलो : १. तानाजी चौगुले (कर्नाटक), २. राकेश पासवान (झारखंड), ३. कुलदीप ढेंगे (महाराष्ट्र).

६५ किलो : १. सी. राहुल (तेलंगणा), २. विक्टर जॉन्सन(केरळ), ३. साहील स्वरगियारी (आसाम). ७० किलो- १. निशू कोनिया (अरुणाचल), २. गोगुला अय्यप्पा (तेलंगणा), ३. प्रतीक अरोरा (दिल्ली). ७५ किलो- १. वैभव व्हानगडे (महाराष्ट्र), २. मोहम्मद झकीर (आंध्र प्रदेश), ३. अमित पुंभार (महाराष्ट्र). ७५ किलोवरील- १. प्रियोबार्त सिंग (आसाम), २. अमित कुमार (दिल्ली), ३. रिझवान खान (मध्य प्रदेश).
मास्टर्स गट – ४० ते ५० वष्रे वयोगट : १. नामदेव मोरे (गुजरात), २. मंदार चवरकर (महाराष्ट्र), ३. सरबजीत सिंग (पंजाब). ५० ते ६० वष्रे वयोगट : १. सुरेश नायर (महाराष्ट्र), २. हारुन सिद्दिकी (महाराष्ट्र), ३. नॉर्बर्ट लोबो (कर्नाटक). ६० वर्षांवरील : १. रविकुमार (कर्नाटक), २. मोधू लश्राम (मणिपूर), ३. चंदम इंदिरा सिंग (मणिपूर).
अपंग गट – ६५ किलोखालील : १. बिक्रमजीत सिंग (पंजाब), २. एस. वसंतकुमार (कर्नाटक), ३. अश्वमकुमार (छत्तीसगढ).
६५ किलोवरील : १. दीपांकर सरकार (मध्य प्रदेश), २. गोपाळ साहा (प. बंगाल), ३. बोरा कोटेश्वर राव (आंध्र प्रदेश).